राज्यपालांनी चूक दाखवून दिली, ती राज्य सरकारला सुधारावी लागली; यामुळे मळमळ आणि तळमळ

    नागपूर (Nagpur) : ओबीसी आरक्षणाच्या (OBC RESERVATION) अध्यादेशावरुन दैनिक सामनामधून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यावर टीका करण्यात आली होती. या टीकेला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उत्तर दिलं आहे. ‘सामना’मध्ये राज्यपालांवर (governor) करण्यात आलेली टीका दर्जाहीन आहे. राज्यपालांच्या पदाचा सन्मान समजून घ्यायला पाहिजे.

    सर्वांत महत्त्वाचे म्हणजे राज्यपालांनी चूक दाखवून दिली, आणि ती राज्य सरकारला सुधारावी लागली, यामुळे जी मळमळ आणि तळमळ दिसतेय, ती या टीकेतून दिसत आहे. पण अशा प्रकारची कितीही जहरी, घाणेरडी आणि खालच्या दर्जाची टीका केली तर त्यातून टीकाकारांची प्रवृत्ती दिसते, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

    पहिल्या अध्यादेशाला स्थगिती मिळाली असती
    ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश पहिल्यांदा ज्या स्वरुपात पाठवला होता, त्या स्वरुपामध्ये तो  झाला असता तरीही कोर्टातून त्यावर स्थगिती आली असती, म्हणून राज्यपालांनी ते सरकारच्या लक्षात आणून दिलं. सरकारने सुधारित अध्यादेश राज्यपालांकडे पाठवला, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

    राज्य सरकारने वेळ वाढवून घेतली
    इम्पिरिकल डेटा नसून तो सेन्सस डेटा आहे सुप्रीम कोर्टात केंद्रानं वेळ वाढवून मागितली नसून राज्य सरकारनं वेळ वाढवून घेतलीय, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.