The number of patients in Nagpur is increasing, although Corona took 3 victims, 90% of the hospital beds are empty ...

गेल्या दोन दिवसांत चार बळी तर, चोवीस तासांत तीन लोकांनी आपला जीव गमावला आहे. तसेच, २७ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे, पोलीस दलात खळबळ माजली आहे.

    नागपूर : मागच्या महिन्याच्या तुलनेत नागपुरातील कोरोना बाधितांची संख्या या महिन्यात वेग धरत आहे. शहरात गुरुवारची बाधितांची संख्या झपाट्याने वाढली होती. त्याच तुलनेत शुक्रवारी बाधितांची संख्या कमी झाली आहे. काळजीची बाबा अशी, गेल्या दोन दिवसांत नागपूर शहरातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्याच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या दोन दिवसांत चार बळी तर, चोवीस तासांत तीन लोकांनी आपला जीव गमावला आहे. 

    तसेच , २७ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे, पोलीस दलात खळबळ माजली आहे. नवीन वर्षाच्या आरंभापासून कोरोना बाधितांच्या संख्येतही वाढ होत आहे. परंतु, आता बाधितांसोबत मृत्यूच्या संख्येतही वाढ होतांना दिसत आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रण बाहेर जाण्याची शक्यता आहे. प्रशासनाच्या चिंतेतही आता वाढ झाली आहे. १४ जानेवारीला जिल्ह्यात तीन कोरोनाबळींची नोंद झाली. तर, एक हजार ७३२ नव्या कोरोना बाधितांची भर पडली आहे. पोलीस विभागातील १२२ जण कोरोना संक्रमित झाले होते. त्यापैकी २७ जण काल बाधित असल्याचे कळले आहे. कोरोनाबाधित पोलिसांना गृह विलगीकरणात पाठविण्यात आलेले आहे.
    मागच्या २४ तासांत नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात तीन हजारपेक्षा जास्त नव्या कोरोना रुग्णांची नोंद झालीय. तर, विभागातील सक्रिय रुग्ण संख्या १० हजारांवर गेलेली आहे. परंतु, रुग्णालयातील बेड मात्र रिकामे असल्याचे दिसत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत २११ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांपैकी ८९ रुग्णांना ॲाक्सिजनची गरज भासलेली नाही, फक्त २६ रुग्णांना ॲाक्सिजन लावण्यात आलेले आहे. यावरुन हे लक्षात येत आहे, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेची तीव्रता  कमी आहे, असे आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी सांगितले. तरी, नागरिकांनी आपली काळजी घेत नियमांचे पालन करणे फारच आवश्यक आहे.