पोलिसाच्या दारुड्या पोट्ट्याले धरुन वस्तीवाल्यायन् टेनपलं न् बे! दादागिरीचा माज क्षणात उतरविला

प्रीतमचे वडील पोलिस खात्यात सहायक पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्याला दोन भाऊ असून तिघेही भाऊ व्यसनी आहेत. त्यामुळे त्यांचे आई-वडील दुसरीकडे राहतात. तिन्ही भाऊ दारू ढोसल्यानंतर वस्तीत दादागिरी करायचे. त्यामुळे वस्तीतील लोक त्रस्त झाले होते.

    नागपूर (Nagpur) : वस्तीत दादागिरी करून दहशत निर्माण करण्याचा (to create terror) प्रयत्न करणाऱ्या पोलिस पूत्राला (The son of a policeman) दादागिरी करणे चांगलीच अंगलट आली. चौघांनी घरात घुसून धुलाई केली आणि सामानाची तोडफोड करीत दुचाकी पेटवून दिली. प्रीतम रमेश माहुरकर (३२, रा. मॉं भवानीनगर, वाठोडा) असे या पोलिस पुत्राचे नाव आहे.

    प्रीतमचे वडील पोलिस खात्यात सहायक पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्याला दोन भाऊ असून तिघेही भाऊ व्यसनी आहेत. त्यामुळे त्यांचे आई-वडील दुसरीकडे राहतात. तिन्ही भाऊ दारू ढोसल्यानंतर वस्तीत दादागिरी करायचे. त्यामुळे वस्तीतील लोक त्रस्त झाले होते. रविवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास प्रीतमचे दोन मित्र त्याच्या घरी आले होते. त्यांनी ओली पार्टी करण्याचा बेत आखला होता.

    दारू ढोसल्यानंतर प्रीतम हा दारात उभा होता. त्यामुळे त्याच्या शेजारी राहणाऱ्या राजेश शंकर खुबाळकर (२५) याने प्रीतमला ‘क्या देख रहा है’ असे म्हटले. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर प्रीतम आपल्या घरी निघून आला. काही वेळानंतर राजेश खुबाळकर, राहुल राम रामटेके, राहुल सरोदे आणि प्रशांत सायरे हे प्रीतमच्या घरी आले. त्याला हातबुक्कीने मारहाण करून प्रीतमच्या घरातील टीव्ही, लाकडी सोफा, फ्रिज, खिडकीच्या काचा फोडल्या. त्याचप्रमाणे अंगणात ठेवलेली पॅशन प्रो दुचाकीला पेटवून ४५ हजाराचे नुकसान केले. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून चौघांनाही अटक केली.