The traffic on the flyovers in Nagpur was stopped by the sound of O Kat

मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देत पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी नागपूरच्या नागरिकांना सावधतेचा इशारा दिलेला आहे. नागरिकांनी नायलॉन मांजाचा वापर टाळावा, असे सांगत त्यांनी नागरिकांना आपल्या जबाबदारीची जाणीव करून दिली आहे.

    नागपूर : मकर संक्रांतीच्या पर्वावर तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला, यासोबत पतंग उडविण्याचा आनंदही लुटल्या जातो. परंतु, पतंगीच्या मांज्या मुळे अपघात होण्याची शक्यता फारच जास्त असते. त्यातल्या त्यात नायलॅान मांजावर बंदी असतांना सुद्धा काही लोक त्याच मांजाचा वापर करीत असतात. पर्यायी त्यामुळे अपघात घडतात तर कधी यात जीवही जाण्याची शक्यता असते. या सर्व परिस्थितीत नागरिक सुरक्षित राहावे म्हणून नागपुरातील उड्डाणपुल (flyover) बंद ठेवण्यात आलेले आहेत.  

    नागपूर शहरातील प्रमुख उड्डाणपुलांपैकी सदर उड्डाणपुल, छत्रपती उड्डाणपुल आणि गोवारी उड्डाणपुलासह इतर सर्व उड्डाणपुल बंद ठेवण्यात आले आहेत. हे उड्डाणपुल सायंकाळी सहा वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. तसेच, प्रत्येक उड्डाणपुला शेजारी नागपूर पोलिसांना तैनात करण्यात आलेले आहे. यासाठी पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले आहेत. पतंगबाजांकडून होणाऱ्या नुकसानीच्या बचावासाठी एक हजार दोनशे पोलीस तैनात करण्यात आले आहे.

     

    पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचा सावधानतेचा इशारा

    मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देत पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी नागपूरच्या नागरिकांना सावधतेचा इशारा दिलेला आहे. तसेच, त्यांनी नायलॉन मांजावर बंदीची आठवण करून देत, पोलीस प्रशासन या विषयी कारवाई करीत असल्याचे सांगितले आहे. नागरिकांनी नायलॉन मांजाचा वापर टाळावा, असे सांगत त्यांनी नागरिकांना आपल्या जबाबदारीची जाणीव करून दिली आहे. जनसहभागाशिवाय ही समस्या संपणार नाही, असेही त्यांनी सांगितले आहे. तसेच, नायलॉन मांजाची विक्री आपल्या निदर्शनास आल्यास तातडीने प्रशासनास कळवावे, अशी विनंतीही त्यांनी जनतेस केली आहे.