Snow everywhere! There is a photo of Amravati in Maharashtra, not Jammu and Kashmir; Presence of thunderstorms with hail

महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात रविवारी सकाळी तुरळक पावसाने हजेरी लावली. विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांत रविवारी सकाळी पावसाला सुरुवात झाली. अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्याला गारपिटीचा तडाखा बसला. याचबरोबर, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यात सकाळीच पावसाचे आगमन झाले. अमरावतीत शनिवारपासूनच अधूनमधून हजेरी लावणारा पाऊस रविवारी सकाळी चांगलाच बरसला. भंडारा आणि नागपूर जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते(The weather forecast came true! Heavy rains in Vidarbha; Crop damage due to hail).

  नागपूर : महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात रविवारी सकाळी तुरळक पावसाने हजेरी लावली. विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांत रविवारी सकाळी पावसाला सुरुवात झाली. अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्याला गारपिटीचा तडाखा बसला. याचबरोबर, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यात सकाळीच पावसाचे आगमन झाले. अमरावतीत शनिवारपासूनच अधूनमधून हजेरी लावणारा पाऊस रविवारी सकाळी चांगलाच बरसला. भंडारा आणि नागपूर जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते(The weather forecast came true! Heavy rains in Vidarbha; Crop damage due to hail).

  ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’मुळे सध्या विदर्भात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे हवामान विभागाने विदर्भात वादळी पावसाचा इशारा दिला होता. तो खरा ठरला. वरुणराजाने शनिवारी अमरावती, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यात हजेरी लावली. अमरावती जिल्ह्यातील टाकरखेडा संभू परिसरातील साऊरकळमगव्हाणा, लसणापूर, रामा, पुसदा, शिराळ्यात गारांसह पाऊस झाला. याचा तूर आणि हरभऱ्याला मोठा फटका बसला. या भागात अर्धा ते पाऊण तास गारांसह पाऊस झाला. नेरपिंगळाई येथे झालेल्या गारपिटीत कांदा, गहू, संत्रा, कापूस या पिकांचे नुकसान झाले. मृगाचा संत्रा गळून पडला.

  वर्धा जिल्ह्यातही पिकांचे नुकसान

  वर्धा जिल्ह्यातील आष्टी आणि कारंजा तालुक्यात वादळी पावसात बोराएवढ्या गारा पडल्या. आष्टी तालुक्यातील खडकी, टोकोडा, भारसवाडा, परसोडा, वाघोली, शिरसोळी, नरसापूर, किन्हाळा आदी भागात जोरदार पाऊस झाला. कारंजा तालुक्यातील पारडी, एकांबा, बोटोणा, सारवाडी, पालोरा, राजणी, बोंदरठाणा या गावात पावसासह गारा पडल्याने पिकांचे नुकसान झाले. वाशिममध्येही अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे रब्बी पिकाचे नुकसान झाले.

  भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपुरसाठी ऑरेंज अलर्ट

  हवामान विभागाने सोमवारी भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपुरसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस आणि गिरपिटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पश्चिमी चक्रवातामुळे विदर्भात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचा इशारा नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने दिला आहे.

  हे सुद्धा वाचा
  • 2022