क्वाॅरंटाईन सेंटरमध्ये चोरी; २३ पंखे, नळाच्या तोट्या आणि बल्ब चोरणाऱ्या चहाविक्रेत्याला अटक

क्वाॅरंटाईन सेंटर (the quarantine center) जायला लोक घाबरतात. तर दुसरीकडे एका चहाविक्रेत्या चोराने (tea vendor) क्वाॅरंटाईन सेेंटरमधून २३ पंखे, नळाच्या तोट्या आणि बल्बची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरीच्या या कृत्यामुळे पोलिसही चक्रावून गेले. मात्र, पोलिसांनी तपास करून आरोपीस अटक केली.

    नागपूर (Nagpur). क्वाॅरंटाईन सेंटर (the quarantine center) जायला लोक घाबरतात. तर दुसरीकडे एका चहाविक्रेत्या चोराने (tea vendor) क्वाॅरंटाईन सेेंटरमधून २३ पंखे, नळाच्या तोट्या आणि बल्बची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरीच्या या कृत्यामुळे पोलिसही चक्रावून गेले. मात्र, पोलिसांनी तपास करून आरोपीस अटक केली.

    मिळालेल्या माहितीनुसार नागपूरमधील पाचपावली येथे एक क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरच्या बाजूलाच विक्की उंदिरवाडे नावाचा एक तरुण चहा विकायचा. मागील कित्येक दिवसांपासून चहा विकत असल्यामुळे त्याला आजूबाजूच्या परिसराची चांगलीच माहिती होती. त्याने क्वारंटाईन सेंटरच्या इमारतीचीसुद्धा माहिती घेऊन ठेवली होती. त्यांतर योग्य ती संधी साधून तो क्वारंटाईन सेंटरच्या इमारतीमध्ये प्रवेश करायचा. तसेच तिथे जाऊन चोरी करायचा.

    असा प्रकारे मागील काही दिवसांपासून या इमारतीत चोरीचे अनेक प्रकार समोर आले होते. क्वारंटाईन सेंटरच्या इमारतीमधील एक किंवा दोन नाही तर चक्क 23 पंखे चोरी केले होते. सोबतच नळाच्या तोट्या आणि विजेचे बल्ब गायब होते. असे प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी चोराचा शोध घेण्याचे ठरवले आणि तपास सुरु केला. मात्र, पोलिसांना यामध्ये यश येत नव्हते. पोलिसांना धागेदोरे सापडत नव्हते.

    पोलिसांनी ठोकल्या बेड्या
    मात्र, एका दिवशी विक्की उंदिरवाडे हा युवक आपल्या बॅगमध्ये पंखा घेऊन जात असल्याचं पोलिसांना दिसलं. तसेच तो संशयित पद्धतीने वावरत असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीदरम्यान विक्की उंदिरवाडे या तरुणाने चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून 23 पंखे आणि इतर वस्तू हस्तगत केल्या आहेत. दरम्यान, या तरुणाच्या अजब चोरीमुळे सगळेच चक्रावले आहेत. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.