विश्वासू मोलकरीनीनेच केली दागिन्यांची चोरी; बेलतरोडी पोलिसांकडून अटक

नागपुरातील एका डॉक्टर कुटुंबियांचा (A doctor's family) त्यांच्या घरातील मोलकरणीवर खूप विश्वास होता. पण संबंधित मोलकरणीने विश्वासघात केला. डॉक्टर कुटुंबाने विश्वासाने त्यांचं घर तिच्या स्वाधीन केलं होतं.

    नागपूर (Nagpur): नागपुरातील एका डॉक्टर कुटुंबियांचा (A doctor’s family) त्यांच्या घरातील मोलकरणीवर खूप विश्वास होता. पण संबंधित मोलकरणीने विश्वासघात केला. डॉक्टर कुटुंबाने विश्वासाने त्यांचं घर तिच्या स्वाधीन केलं होतं. संबंधित कुटुंब कामानिमित्त घर सोडून बाहेर गेलं होतं. पण मोलकरणीने वेळ साधत घरातील दागिन्यांवर डल्ला मारला. अखेर या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मोलकरीण महिलेला बेड्या ठोकल्या आहेत.

    कुटुंबाने घरातील सदस्याप्रमाणे वागवलं, पण….
    अनेक वर्षांपासून घरी मोलकरीण असलेल्या महिलेवर डॉक्टर कुटुंबियांनी विश्वास ठेवला होता. या कुटुंबाने तिला घरातील सदस्यांप्रमाणे वागणूक दिली. मात्र घरातील पैसे बघून तिची नियत बिघडली. तिने हळूहळू पैसे चोरी करणे सुरू केले. कोणाच्याही लक्षात येत नाही हे बघून तिची लालच वाढली. त्यानंतर तिने चक्क कपाटातील दागिने चोरी केले. ही बाब लक्षात येताच डॉ. संजय कुमार बारीक यांनी पोलिसात तक्रार दिली.

    पोलिसांनी चोराचा सुगावा कसा लावला?
    चोराचा सुगावा लागणे कठीण होते. मात्र आरोपी मोलकरीण सीमा कटरे ही आनंदात फिरत होती. त्यामुळे पोलिसांना संशय आला. त्यांनी तिची चौकशी केली. यावेळी तिने आपला गुन्हा कबूल केला. तिने चोरी केलेले दागिने एका ज्वेलर्स दुकानाला 2 लाख 75 हजारात विकले होते. हे दागिने विकण्यासाठी तिने ज्वेलर्सला आपला पती आजारी असून तिचं ऑपरेशन करायचं असल्याचं कारण दिलं. मात्र पोलिसांनी तिला अटक करून सगळा मुद्देमाल जप्त केला. मात्र या घटनेमुळे विश्वास ठेवायचा तरी कोणावर? असा प्रश्न निर्माण झाला आहे.