There was a breakdown on the track in the metro carrying the passengers, because the passengers were shocked when they found out nrsj

अवघ्या काही मिनीटांत दुसरी मेट्रो आली आणि दहा मिनीटांत कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या मेट्रोसह जोडले आणि ओढून जवळील स्टेशनपर्यंत पोहचवण्यात आले. हा सगळा प्रकार मेट्रोतील नागरिक पाहत होते. नजीकच्या स्टेशनवर पोहचल्यावर प्रवाशांनी दुसऱ्या मेट्रोने प्रवास केला.

नागपूर : नागपूरमध्ये प्रवाशांना घेऊन जाणारी मेट्रोत ट्रॅकवर असताना बिघाडा झाला. त्यामुळे मेट्रो ट्रॅकवरच अचानक थांबली. यानंतर मेट्रो ऑपरेटरने काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मेट्रो पुढे जाऊ शकत नाही अशी घोषणा माईकद्वारे दिली. यानंतर प्रवाशांमध्ये एकच खळबळ माजली होती. परंतु थोडा वेळातच दुसऱी मेट्रो आली आणि बंद पडलेल्या मेट्रोला ओढत स्टेशनपर्यंत आणले. यामध्ये मोट्रो कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली होती. हा सगळा थरार प्रवाशांना अनुभवायला मिळाला.

नागपूरमध्ये शनिवारी रात्री ८:४५ वाजता महामेट्रोच्या एयरपोर्ट साउथ मेट्रो स्टेशन येथून खापरी मेट्रो स्टेशनकडे निघालेल्या ट्रेनमध्ये अचानक तात्रिक बिघाड झाला. मेट्रो एयरपोर्ट मेट्रो स्टेशन ते न्यू एयरपोर्ट मेट्रो स्टेशनदरम्यान अचानक मेट्रो थांबल्याने प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पाहायला मिळाले. मेट्रोच्या ऑपरेटरने माईकद्वारे तांत्रिक बिघाडामुळे मेट्रो थांबल्याचे सांगितले. तसेच दुसऱ्या मेट्रोच्या साहाय्याने दुसऱ्या स्थानकावर नेण्यात येणार आहे असेही या ऑपरेटरने सांगितले.

अवघ्या काही मिनीटांत दुसरी मेट्रो आली आणि दहा मिनीटांत कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या मेट्रोसह जोडले आणि ओढून जवळील स्टेशनपर्यंत पोहचवण्यात आले. हा सगळा प्रकार मेट्रोतील नागरिक पाहत होते. नजीकच्या स्टेशनवर पोहचल्यावर प्रवाशांनी दुसऱ्या मेट्रोने प्रवास केला. तसेच तांत्रिक बिघाड झालेल्या ट्रेनला मिहान डेपो येथे पाठविण्यात आले. परंतु हे सर्व नियोजित असल्याचे मेट्रो प्रशासनाने सांगितले.

मेट्रोनी हा मॉकड्रिल केला असल्याचे घोषणा केल्यावर प्रवाशांना मोठा धक्काच बसला आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने महामेट्रो अशाप्रकारे नेहमीच अशा प्रकारे मॉक ड्रिल करत असते. हा सर्व प्रकार नियोजित होता. या थराराने मेट्रोचे अधिकारी, कर्मचारी उत्तम सेवा देण्यासाठी किती तत्पर आहेत. हे स्पष्ट झाले आहे.