अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकविले; लग्नाचे आमिष दाखवून केले गर्भवती

पीडित मुलगी मूळची अकोल्याची आहे. तीन वर्षांपूर्वी तिचे कुटुंब नागपुरात राहायला आले. मुलीला वडील नाहीत. तिची आई मिळेल ते काम करते. आरोपी ईस्लाम खानची या मुलीसोबत ओळख झाल्यानंतर त्याने तिला प्रेमपाशात ओढले.

    नागपूर (Nagpur) : १५ वर्षांच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात (love trap) अडकवून एका भामट्याने तिला आईच्या घरून (mother’s house) पळवून तब्बल चार महिने तिला पत्नीसारखे वागवून गर्भधारणेनंतर (after getting pregnant) लग्नाला नकार दिला. हंसापुरीतील कसानपुऱ्यात नेले. ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल करून आरोपी ईस्लाम खान नासिर खान (वय २१) (Islam Khan Nasir Khan) याला अटक केली आहे.

    पीडित मुलगी मूळची अकोल्याची आहे. तीन वर्षांपूर्वी तिचे कुटुंब नागपुरात राहायला आले. मुलीला वडील नाहीत. तिची आई मिळेल ते काम करते. आरोपी ईस्लाम खानची या मुलीसोबत ओळख झाल्यानंतर त्याने तिला प्रेमपाशात ओढले. त्यात तिला अडकवल्यानंतर २५ मे रोजी लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. तब्बल चार महिने ईस्लामने तिला पत्नीसारखे वागवून तिचे शारीरिक शोषण केले. तिला गर्भधारणा झाल्याने आरोपीने तिला झिडकारणे सुरू केले.

    ही बाब मुलीच्या आईला माहीत झाल्यानंतर तिने आरोपी आणि त्याच्या नातेवाईकांची समाजातील काही मंडळींच्या माध्यमातून समजूत काढण्याचे प्रयत्न केले; मात्र ईस्लाम दाद देत नसल्याने पीडित मुलीने रविवारी पाचपावली ठाण्यात तक्रार नोंदवली. पीएसआय श्रीनिवास दराडे यांनी तपास करून पोक्सो कायद्यानुसार, अपहरण करून बलात्कार केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. आरोपी ईस्लामला अटक करण्यात आली.