नागपुरात आढळल्या दुर्मिळ ‘पॅराबॉम्बे’ रक्तगटाच्या दोन व्यक्ती; जाणून घ्या या रक्तगटाबद्दल!

नागपुरात 'पॅराबॉम्बे' रक्तगट असणाऱ्या दोन व्यक्ती आढळल्या (2 people found Para bombay blood group) आहेत. पॅराबॉम्बे हा एक दुर्मीळ रक्तगट असून खूपच कमी लोकांमध्ये अशा प्रकारचा रक्तगट असतो. मागील बऱ्याच वर्षांपासून हा रक्तगट असणाऱ्या व्यक्ती आढळल्या नाहीत.

    नागपूर (Nagpur) : नागपुरात ‘पॅराबॉम्बे’ रक्तगट असणाऱ्या दोन व्यक्ती आढळल्या (2 people found Para bombay blood group) आहेत. पॅराबॉम्बे हा एक दुर्मीळ रक्तगट असून खूपच कमी लोकांमध्ये अशा प्रकारचा रक्तगट असतो. मागील बऱ्याच वर्षांपासून हा रक्तगट असणाऱ्या व्यक्ती आढळल्या नाहीत; पण नागपुरात या रक्तगटाची ही पहिलीच केस असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आढळून आलेल्या दोन्ही व्यक्ती ‘पॅराबॉम्बे ओ पॉझिटिव्ह’ या अति दुर्मिळातील दुर्मीळ रक्तगटाच्या आहेत.

    नागपुरात डॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या वतीने अलीकडेच एका रक्तदान शिबीराचं आयोजन केलं होतं. दरम्यान एका मुलाचा रक्तगट तपासला असता, हा रक्तगट ‘पॅराबॉम्बे’ रक्तगट असल्याचं चाचणीत निष्पन्न झालं. पण एरवी अशाप्रकारचं रक्त आढळत नसल्याने वैद्यकीय कर्मचाऱ्यांना देखील धक्का बसला.

    जाणून घ्या काय आहे ‘पॅरा बॉम्बे रक्तगट’! (Find out what is ‘Para Bombay Blood Group’!)
    पॅरा बॉम्बे रक्तगटामध्ये H प्रतिजन तसेच H प्रतिपिंडे असतात. या रक्तगट असलेल्या व्यक्तींना रक्तसंक्रमण झाल्याशिवाय कोणत्याही गुंतागुंतीचा सामना करावा लागत नाही. डॉक्टर म्हणाले की, प्राथमिक स्तरावरील एक सामान्य प्रयोगशाळा हा रक्तगट फक्त ”O” म्हणून ओळखेल. “यामुळे गोंधळ वाढतो.