मुंबई लोकल कधी सुरू होणार?, विजय वडेट्टीवार म्हणाले की…

मुंबईकरांना लोकल प्रवासासाठी अजून प्रतिक्षा करावी लागणार आहे. विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी बोलताना ही माहिती दिली. मुंबईची लोकल कधी सुरू होणार?, असा सवाल वडेट्टीवार यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. कोरोना संपेपर्यंत मुंबईत लोकल सुरू होणार नाही, असं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यातून कोरोना गेलेला नाही. काही जिल्ह्यात अजूनही कोरोनाची चिंताजनक स्थिती आहे. त्यामुळे स्वत:हून मृत्यूला आमंत्रण देऊ नये. सर्वांनी कोरोनाचे नियम पाळावेत, असं आवाहन त्यांनी केलं.

  नागपूर : मुंबईकरांचा लोकलचा प्रवास अजून लाबंताना दिसत आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यानंतर राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही मुंबईची लोकल इतक्यात सुरू होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

  वडेट्टीवार काय म्हणाले ?

  त्यामुळे मुंबईकरांना लोकल प्रवासासाठी अजून प्रतिक्षा करावी लागणार आहे. विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी बोलताना ही माहिती दिली. मुंबईची लोकल कधी सुरू होणार?, असा सवाल वडेट्टीवार यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. कोरोना संपेपर्यंत मुंबईत लोकल सुरू होणार नाही, असं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यातून कोरोना गेलेला नाही. काही जिल्ह्यात अजूनही कोरोनाची चिंताजनक स्थिती आहे. त्यामुळे स्वत:हून मृत्यूला आमंत्रण देऊ नये. सर्वांनी कोरोनाचे नियम पाळावेत, असं आवाहन त्यांनी केलं.

  तसेचं आम्ही मंत्री असलो तरी ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. तसेच निवडणुका न घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. ही चर्चा सकारात्मक होती, असा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका न घेण्याबाबत मुख्यमंत्रीही सकारात्मक असल्याची जोरदार चर्चा आहे.

  दरम्यान भाजपने ओबीसी आरक्षणावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. पण भाजपच्या आंदोलना आधीच निवडणुका न होऊ देण्याचा आम्ही इशारा दिला आहे. त्यामुळे आता भाजपचे वरातीमागून घोडे आहेत, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

  येत्या 26 आणि 27 जून रोजी लोणावळ्यात चिंतन बैठक

  ओबीसी आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी येत्या 26 आणि 27 जून रोजी लोणावळ्यात चिंतन बैठक होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. आम्ही इम्पिरिकल डेटाबाबत केंद्राकडे आम्ही मागणी केली आहे. केंद्राकडून हा डेटा मिळावा ही अपेक्षा आहे. तसेच डेटा गोळा करण्याचं काम आयोगाला देण्यात आलं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

  … तरी स्वप्नच पाहा

  आमदार प्रताप सरनाईक यांनी लिहिलेल्या पत्रानंतर शिवसेना पुन्हा भाजपसोबत जाण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यावर काहीही झालं तरी पुढचे साडेतीन वर्षे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहणार आहेत. कितीही ईडी आणि सीबीआयचा दबाव आणला तरी तुम्ही स्वप्न बघत राहा. आमची वाटचाल सुरूच राहील, असं त्यांनी सांगितलं. केंद्रीय संस्था कशाप्रकारे वागत आहेत, हे दाखवण्यासाठी सरनाईक यांचे हे पत्र आहे. असं मला वाटतेय, असा चिमटाही त्यांनी काढला.

  महापौर काय म्हणाल्या?

  महापौर किशोरी पेडणेकर यांनीही मुंबई लोकलबाबत भाष्य केलं आहे. सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. या संदर्भातील निर्णय पालिकेने घेतलेला नाही, असं किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलं आहे.