2024 मध्ये मुख्यमंत्री कुणाचा होणार?, प्रफुल्ल पटेल काय म्हणाले ? : वाचा सविस्तर

विधानसभा निवडणूकांना अजून खूप वेळ आहे. त्यामुळे त्या अगोदरच युती, आघाडी यावर भाष्य करण्यात शहाणपणा नाही, असं म्हणत प्रफ्फुल यांनी स्वबळाची भाषा करण्यांना फटकारलं आहे. आज नागपूरमध्ये प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. त्यावरही पटेल यांनी प्रतिक्रिया दिली. लोकशाहीत कुणालाही मुख्यमंत्री होता येतं. ज्या पक्षाचे आमदार जास्त असतील आणि ज्यांना लोकांचा पाठिंबा असेल तो मुख्यमंत्री होईल, असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.

  नागपूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुढील विधानसभा निवडणूकीसाठी स्वबळाचे नारे दिले जात आहेत. त्यावरून राज्यात चर्चांना उधाण आलं आहे. तसेच 2024 मध्ये कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार? या मुद्यावरूनही खूप बोललं जात आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी यावर वक्तव्य केल आहे.

  विधानसभा निवडणूकांना अजून खूप वेळ आहे. त्यामुळे त्या अगोदरच युती, आघाडी यावर भाष्य करण्यात शहाणपणा नाही, असं म्हणत प्रफ्फुल यांनी स्वबळाची भाषा करण्यांना फटकारलं आहे. आज नागपूरमध्ये प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. त्यावरही पटेल यांनी प्रतिक्रिया दिली. लोकशाहीत कुणालाही मुख्यमंत्री होता येतं. ज्या पक्षाचे आमदार जास्त असतील आणि ज्यांना लोकांचा पाठिंबा असेल तो मुख्यमंत्री होईल, असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.

  दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजप आणि काँग्रेस पक्षाने पुढील निवडणुकीमध्ये स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचा नारा दिला होता. यावर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी इतर पक्षांनी स्वबळाचा नारा दिला असेल, तर महाराष्ट्र राज्यात फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनच पक्ष उरले आहेत. हे दोन पक्ष एकत्र आले, तर राज्यात चमत्कार होईल असंही राऊत म्हणाले होते.

  शिवसेना आणि काँग्रेसने गेल्या काही दिवसांपासून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळ आणि आघाडीत बिघाडी बाबत परस्पर विरोधी वक्तव्यांची राळ उडवली आहे. मात्र राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शिवसेना नेते संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या या चर्चाबाबत काहीच भाष्य करण्यात शहाणपणा नाही, कारण निवडणुकांना अवकाश आहे असे सांगत फेटाळून लावल्या आहेत.

    आधीच स्वबळाची भाषा करणे शहाणपणाचे नाही

  प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, निवडणुकांना आणखी तीन वर्ष बाकी आहेत. त्या आधीच युती, आघाडी, स्वबळाची भाषा करणे शहाणपणा नाही, ते म्हणाले की, ‘सामना’ वाचल्यावर काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांनीही निवडणुकांबाबतचा निर्णय २०२३मध्ये होईल असे म्हटले आहे. त्यामुळे त्यावर आताच भाष्य करणे योग्य नाही, असेही पटेल म्हणाले.

  पंतप्रधानांनी बोलणे यात काही गैर नाही

  काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले होते. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बंद खोलीत चर्चा झाली होती. त्यावरही मुख्यमंत्री आणि देशाच्या पंतप्रधानांनी बोलणे यात काही गैर नाही, असे ते म्हणाले. तसेच ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत तिन्ही पक्षात समन्वय आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.