नागपुरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत घट; पण कोरोना Active रुग्णसंख्येत वाढ

    नागपूर (Nagpur): नागपूर मनपाच्या (Nagpur Municipal Corporation) सकारात्मक प्रयत्नांमुळे शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या कमालीची कमी झाली आहे. विभागाकडून प्राप्त अहवालानुसार रविवारी केवळ 04 कोेरोना पॉझिटिव्ह रुग्णांची (corona positive patients) नोंद करण्यात आली. परंतु, शहरातील कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची (corona active patients) वाढली संख्या आरोग्य विभागासाठी (the health department) चिंतेची बाब ठरत आहे. रविवारी शहरात 62 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

    रविवारी 02 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले. आजही कोरोनामुळे कोणत्याही नागरिकाचा मृत्यू झालेला नाही. कोरोनाला अटकाव करण्यासाठी रविवारी 3141 नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यापैकी 3137 चाचण्यांचा अहवाल निगेटिव्ह आढळून आला. आरोग्य विभागाकडून रविवारी 13 लाख 64 हजार 782 नागरिकांना कोरोनाची पहिली लस टोचण्यात आली.

    यासह 6 लाख 49 हजार 413 नागरिकांना कोरोनाची दुसरी लस टोचल्या गेली. शहरात कोरोना रुग्णांची संख्या घटली असली तरी कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. नियमांचे पालन करूनच आपण कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखू शकतो, असे मत ”नवराष्ट्र न्यूज नेटवर्क टीम”कडून जाहीर करण्यात आले आहे.