dahi samosa

वर्ध्याच्या (Wardha)अंबिका हॉटेलमध्ये दही कलाकंद,दही समोसा खाल्ल्याने ११ (Food Poisoning To 11 People) लोकांची प्रकृती खराब झाली आहे.

    वर्धा : वर्ध्याच्या (Wardha) नामांकित अंबिका हॉटेलमध्ये दही कलाकंद,दही समोसा खाल्ल्याने ११ (Food Poisoning To 11 People) लोकांची प्रकृती खराब झाली आहे. काल सायंकाळी ६ वाजता दही समोसा खाल्याने ११ लोकांना अन्नबाधा झाली आहे. वर्ध्याच्या आनंद नगर,अशोक नगर मधील हे ११ जण आहेत. दरम्यान ११ रुग्णांना वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच १ रुग्ण सावंगी येथे उपचारासाठी हलविण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

    वर्धा शहराचे पोलीस निरीक्षक सत्यविर बंडीवार रुग्णालयात दाखल आहेत. अन्नबाधेत एका ५ वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. तसेच २ महिलांना ही अन्नबाधा झाल्याची माहिती मिळाली आहे. अन्नबाधा झालेल्या सर्व रुग्णांना उलटी,हगवण यांचा मोठा त्रास होत आहे. नामांकित अंबिका हॉटेलच्या पदार्थ खाल्याने अन्नबाधा झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.