पुन्हा आढळले १६ कोरोना पॉझिटीव्ह

वर्धा: कोरोना संक्रमितांचा आकडा वाढतच चालला आहे. शनिवारी पुन्हा १६ रूग्ण आढळल्याचे वृत्ताला प्रशासनाने दुजोरा दिला आहे. यात आर्वी तालुक्यात, वर्धेत ४, आष्टीचे २ व देवळी तालुक्यातील एका रूग्णाचा समावेश आहे.

आर्वीत ९, आष्टी २, वर्धा ४ व देवळी तालुक्यात १

वर्धा:  कोरोना संक्रमितांचा आकडा वाढतच चालला आहे. शनिवारी पुन्हा १६ रूग्ण आढळल्याचे वृत्ताला प्रशासनाने दुजोरा दिला आहे. यात आर्वी तालुक्यात, वर्धेत ४, आष्टीचे २ व देवळी तालुक्यातील एका रूग्णाचा समावेश आहे.

 आर्वी शहरासह आता ग्रामीण तालुक्यात कोरोना रूग्ण आढळून येत आहे. जिल्हयातील आर्वी शहर कोरोनाने सगळयात प्रभावित झाले आहे. कोरोना आजार  आर्वी तालुक्यात वेगाने पसरत आहे. आर्वी तालुक्यातील रूग्ण संख्या शतकाकडे वाटचाल करीत आहे.  आर्वीत नवीन  ९ कोरोनाबाधित आढळून आले आहे. एन्टीजेन तपासणीत ८ कोरोनाबाधित आढळून आले. तालुक्यातील वाठोडा येथील   ८२  वृध्द महिला कोरोनाबाधित आढळली  आहे. आष्टी तालुक्याच्या साहुर येथील ५४ वर्षीय पुरूष व ३ वर्षीय बालक कोरोना बाधित आढळला आहे.  वर्धा तालुक्यात  वरूड येथील २३ वर्षीय युवक, सेवाग्राम येथे ३५ वर्षीय पुरुष, गांधी नगरात १८  वर्षीय व सानेगुरुजीनगरात  २३  वर्षीय युवती  पॉझिटीव्ह आढळून आली आहे.  सदर युवती सावंगी  रूग्णालयात कार्यरत आहे. देवळी तालुक्यातील  सोनेगांव (आबाजी) येथील २४  वर्षीय युवक  कोरोनाबाधित आढळून आला आहे.  जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २१० वर गेला आहे. इंडोरामा कांपनीचे १०  कर्मचा-यांना पकडून हा आकडा २२० वर गेला आहे. प्रशासनाने  संबंधित क्षेत्रात उपाययोजना सुरू  केल्या आहे.