शहीद कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाखांचा धनादेश वितरित; पोलिस मुख्यालयात व्यक्त केली सदभावना

जिल्हयातील पोलिस विभागात कार्यरत पोलिस कर्मचाऱ्यांने आपला जीव धोक्यात टाकून सेवा दिली. याच पार्श्वभूमीवर कोरोना महामारीत मृत पावलेल्या शहीद पोलिस कर्मचाऱ्याच्या वारसांना 50 लाखांची मदत पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर , वर्धा जिल्हा पोलिस विभागाचे सहायक विजय आंबटकर यांच्या उपस्थितीत पोलिस मुख्यालयात देण्यात आली.

    वर्धा़ (Wardha).  जिल्हयातील पोलिस विभागात कार्यरत पोलिस कर्मचाऱ्यांने आपला जीव धोक्यात टाकून सेवा दिली. याच पार्श्वभूमीवर कोरोना महामारीत मृत पावलेल्या शहीद पोलिस कर्मचाऱ्याच्या वारसांना 50 लाखांची मदत पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर , वर्धा जिल्हा पोलिस विभागाचे सहायक विजय आंबटकर यांच्या उपस्थितीत पोलिस मुख्यालयात देण्यात आली.

    पोलिस कर्मचाऱ्यांचा 18 डिसेंबर 2020 रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनामुळे कोणत्याही पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना 50 लाख रुपये सानुग्रह मदत देण्याचा शासन निर्णय आहे. शहीद पोलिस कर्मचा-यांच्या वारसांना त्यांचे अडीअडचणीच्या काळात आर्थिक मदतीचा हातभार लागावा या अनुषंगाने पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी पोलिस महासंचालक कार्यालयाशी समन्वय साधला. शहीद झालेल्या कर्मचारी यांच्या वारसांना सानुग्रह अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. या शासन निर्णयाच्या अनुषंगाने कोरोनाकाळात कर्तव्य पार पाडीत असताना कोरोना विषाणूची लागण होऊन शहीद झालेले सहाय्यक फौजदार विजय आंबटकर यांची पत्नी मेघा विजय आंबटकर यांना 50 लाख रुपये रकमेचा धनादेश पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

    पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत बागडी यांची देय असलेली उर्वरित रक्कम 10 लाखाचा धनादेश त्यांच्या वारसांना देण्यात आला. यावेळी प्रभारी पोलिस उपअधीक्षक खांडेकर, पोलिस निरीक्षक निलेश ब्राम्हणे, महेंद्र इंगळे उपस्थित होते. वर्धा जिल्हयातील पोलिस विभागात कार्यरत पोलिस कर्मचाऱ्यांने आपला जीव धोक्यात टाकून सेवा दिली. याच पार्श्वभूमीवर कोरोना महामारीत मृत पावलेल्या शहीद पोलिस कर्मचाऱ्याच्या वारसांना 50 लाखांची मदत पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर , वर्धा जिल्हा पोलिस विभागाचे सहायक विजय आंबटकर यांच्या उपस्थितीत पोलिस मुख्यालयात देण्यात आली.