वर्धा जिल्ह्यात आढळले ५४ नवीन कोरोना बाधित

जिल्हयात २६८ जणांचा कोरोना आजाराने मृत्यू झाला आहे. जिल्हयात एकूण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ३२५ झाली आहे.

वर्धा. जिल्हा आरोग्य विभगाला प्राप्त अहवालापैकी ५४ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर एका जणाचा कोरोना  आजाराने मृत्यू झाला आहे. मृतकांमध्ये हिंगणघाट तालुक्यातील एका ७१ वर्षीय पुरूषाचा  समावेश आहे.
कोरोना बाधितांमध्ये वर्धा ३८, देवळी २, हिंगणघाट ९, सेलू १, कारंजा १ व समुद्रपूर तालुक्यातील ३ रूग्णांचा समावेश आहे. आर्वी व आष्टी तालुक्यात एकही कारोना बाधित रूग्ण आढळून आला नाही. कोरोना बाधितांमध्ये  ३४ पुरूष व २० महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या ८ हजार ८३८ झाली आहे. आज ३६ तर आतापर्यत एकूण ८ हजार २४५ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. आज एका रूग्णाचा तर आतापर्यत जिल्हयात २६८ जणांचा कोरोना आजाराने मृत्यू झाला आहे. जिल्हयात एकूण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ३२५ झाली आहे.