मेटाडोरची दुचाकीला जोरदार धडक; दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

भरधाव मेटाडोरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला. ही घटना खरांगना पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मासोद गावातील बस स्थानक परिसरात घडली. रोशन सुरेश काकडे (वय 21, जोगा हेटी ता. कारंजा) असे मृत युवकाचे तर सागर साठे असे गंभीर जखमी युवकाचे नाव आहे.

    वर्धा : भरधाव मेटाडोरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला. ही घटना खरांगना पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मासोद गावातील बस स्थानक परिसरात घडली. रोशन सुरेश काकडे (वय 21, जोगा हेटी ता. कारंजा) असे मृत युवकाचे तर सागर साठे असे गंभीर जखमी युवकाचे नाव आहे.

    काकडे हा त्याचा मित्र सागर साठेबरोबर जोगा हेटीवरून खरांगण्याच्या दिशेने दुचाकीने (एमएच 32 एक्यू 9082) निघाले होते. दरम्यान मासोद गावाच्या वळण रस्त्यावर खरांगण्याकडून बांदडापूरच्या दिशेने जाणाऱ्या गाडीने दुचाकीला धडक दिली. या अपघातात रोशन काकडे याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर सागर साठे हा गंभीर जखमी झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक नागरीकांच्या मदतीने जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

    याप्रकरणी अशोक काकडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मेटाडोर चालकाविरुद्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.