वर्धा जिल्ह्यात आणखी ३२६ कोरोना रुग्णांची भर; प्रशासनाची चिंता वाढली

वर्धा जिल्ह्यात मागील 24 तासात 1870 चाचण्या करण्यात आल्या असून शनिवारी आणखी 326 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. आज आयसोलेशनमध्ये असलेले एकूण 1490 रुग्ण आहेत.

    रामेश्वर काकडे
    वर्धा (Wardha). जिल्ह्यात मागील 24 तासात 1870 चाचण्या करण्यात आल्या असून शनिवारी आणखी 326 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. आज आयसोलेशनमध्ये असलेले एकूण 1490 रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना चाचणीसाठी पाठवलेले एकूण स्त्राव नमुने – 168457 असून त्यापैकी अहवाल प्राप्त 168444 झाले त्यापैकी निगेटिव्ह 150892 आले तर प्रलंबित अहवाल 13 आहेत.

    जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित संख्या 16365 झाली असून आज कोरोनामुक्त- 217 तर एकूण कोरोनामुक्त 14301 झाले आहेत. आज मृत्यू 3 (वर्धा – पुरुष 71, महिला 68, देवळी महिला 65 ) तर एकूण मृत्यू 404 झाले आहेत. ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह 1660 रुग्ण आहेत. शनिवारी आलेल्या अहवालात वर्धा 158 (पुरुष 99 महिला 59), हिंगणघाट 31 (पुरुष 19 महिला 12), देवळी 63 (पुरुष 38 महिला 25), आर्वी 26 ( पुरुष 16 महिला 10), आष्टी 06( पुरुष 06 महिला 00),  6) कारंजा 16 (पुरुष 14 महिला 02), समुद्रपूर 13 (पुरुष 11 महिला 2), सेलू 13 ( पुरुष 9 महिला 4) असे एकूण 326 रुग्ण आढळून आले असून त्यात पुरुष 212 तर 114 महिलांचा समावेश आहे.