Among the remains found at Kadam Hospital is another skull

या गर्भपात प्रकरणात नवीन माहिती समोर येत आहे. त्यामुळे या मागे मोठे रॅकेट असल्याची शंका वर्तविल्या जात आहे. आतापर्यंत या प्रकरणात एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.

    वर्धा : संपूर्ण राज्यात आरोग्य क्षेत्रात खळबळ माजविणाऱ्या कदम रुग्णालयातील प्रकरणात रोज नवनवीन माहिती पुढे येत आहे. काल  सुमारे पाच तास चाललेल्या खोदकामातून आणखी एक कवटी सापडल्याची माहिती पोलीस निरीक्षक यांनी दिली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार १२ कवट्या आणि ५५ हाडांचे अवशेष सापडले आहे.    

    या रुग्णालयावर आधीपासूनच एका १३ वर्षीय मुलीचा अवैध गर्भपात केल्या प्रकरणी कारवाई सुरु आहे. गर्भपात प्रकरणात रुग्णालयाच्या संचालिका डॉ. रेखा कदम आणि परिचारिका संगीता काळे यांना अटक झाली होती. तसेच, एक अल्पवयीन मुलगा व त्याचे आई-वडीलना यांना सुद्धा अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.
    तसेच, या गर्भपात प्रकरणात नवीन माहिती समोर येत आहे. त्यामुळे या मागे मोठे रॅकेट असल्याची शंका वर्तविल्या जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कवट्या सापडत असल्यामुळे ही शंका अधिकच गडद होताना दिसत आहे.  त्या दिशेने पोलिसांचा सखोल तपास सुरु आहे.