लग्नाचे आमिष देऊन युवतीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

युवतीला लग्नाचे आमिष देत तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आला. ही घटना ६ डिसेंबर रोजी उघडकीस आली. आमीर सोएल (२६) रा. तळेगाव असे अत्याचार करणा-या आरोपीचे नाव आहे.

तळेगाव (श्यामजीपंत) (Talegaon Shyamjipant). युवतीला लग्नाचे आमिष देत तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आला. ही घटना ६ डिसेंबर रोजी उघडकीस आली. आमीर सोएल (२६) रा. तळेगाव असे अत्याचार करणा-या आरोपीचे नाव आहे.

वर्धा जिल्ह्यातील तळेगाव येथील युवती नागपूर येथील कंपनीत कामाला आहे. यामुळे ती नागपूरला भाडयाचे घरात राहते. याच दरम्यान शेजारी राहणारा आमीर तिचे घरी पोहोचला. जबरजस्तीने अत्याचार केला. युवतीने वडीलांना सांगण्याची धमकी दिली असता लग्न करण्याचे आमिष दिले. यानंतर तळेगाव व नागपूर येथे वारंवार अत्याचार करण्यात आला. युवतीने लग्नाची गळ घातली असता त्याने नकार दिला. युवतीला तिची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने तळेगाव पोलिसांत तक्रार केली. त्या आधारे पोलिसांनी आमीर सोएल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आशीष गजभिये करीत आहे.