भाजपला जिल्हा आणि तालुका पातळीवर गळती; हिंगणघाटमध्ये ९ नगरसेवक ‘शिवबंधन’ बांधणार

महाराष्ट्रात (In Maharashtra) शिवसेना-राष्ट्रवादी-काॅंग्रेस (Shiv Sena-NCP-Congress) पक्षांच्या युतीने सत्तास्थापनेसाठी महाविकास आघाडीची स्थापना केली; आघाडी सरकारने आता स्थानिक पातळींवरही आपला दबदबा जमविण्यासाठी भाजपमधील नाराज नेत्यांना आणि नगरसेवकांना (BJP leaders and corporators) आपल्या बाजूने वळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

  संजय तिगावकर
  वर्धा (Wardha).  महाराष्ट्रात (In Maharashtra) शिवसेना-राष्ट्रवादी-काॅंग्रेस (Shiv Sena-NCP-Congress) पक्षांच्या युतीने सत्तास्थापनेसाठी महाविकास आघाडीची स्थापना केली; आघाडी सरकारने आता स्थानिक पातळींवरही आपला दबदबा जमविण्यासाठी भाजपमधील नाराज नेत्यांना आणि नगरसेवकांना (BJP leaders and corporators) आपल्या बाजूने वळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

  या दरम्यान वर्धा जिल्ह्यातील (Wardha district) हिंगणघाट नगरपरिषदेतील (Hinganghat Municipal Council) भाजपचे नाराज नगरसेवक शिवसेनेची वाट धरत असल्याची बातमी पुढे आली आहे. हिंगणघाट येथील भाजपाचे 9 नगरसेवक आणि एक अपक्ष नगरसेवक शिवसेना पक्षात मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानावर आज सोमवारी सायंकाळी प्रवेश घेणार आहे. हिंगणघाट नगरपरिषदमध्ये भारतीय जनता पक्षाने एकूण 38 जागांपैकी 28 जागेवर यश मिळवले होते. 2016 ला नोव्हेंबर महिन्यात निवडणूक पार पडली होती.

  स्थानिक राजकारणातील नेतृत्वाशी सुसंवाद नसल्याने प्रत्येक नगरसेवकाचा व्यक्तिगत भ्रमनिरास झाल्याची माहिती सूत्राकडून मिळाली आहे. सुसंवाद नसल्याने काही महिन्यापासून नगरसेवक नाराज आहेत. त्यामुळेच या नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाचा विरोध करून शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले.

  आज सायंकाळी राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भाजपचे नऊ नगरसेवक आणि एक अपक्ष नगरसेवक प्रवेश घेत आहे. त्यासोबतच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चे सचिव बंटी वाघमारे यांचा सुद्धा प्रवेश होणार आहे.

  यासाठी नगर परिषदेचे विद्यमान उपाध्यक्ष आणि भाजपचे चंद्रकांत घुसे , सतीश धोबे, भास्कर ठवरी, मनोज वरघने, नीता धोबे, निलेश पोगले, सुनिता पचोरी, नगर परिषदेच्या शिक्षण सभापती संगीता वाघमारे आणि मनिष देवडे तर अपक्ष नगरसेवक सुरेश मुंजेवार मुंबई येथे पोहोचले आहेत.