tadas marriage

वर्ध्याचे(Wardha) भाजपचे खासदार रामदास तडस(BJP MP Ramdas Tadas) यांची सून पुजाने कुटुंबाकडून छळ होत असल्याचे आरोप केले होते. त्यानंतर आता तडस यांचा मुलगा पंकज तडस आणि पूजा यांचे वैदीक पद्धतीने लग्न लावण्यात आले आहे.

    वर्धा : वर्ध्याचे(Wardha) भाजपचे खासदार रामदास तडस(BJP MP Ramdas Tadas) यांची सून पुजाने कुटुंबाकडून छळ होत असल्याचे आरोप केले होते. त्यानंतर आता तडस यांचा मुलगा पंकज तडस आणि पूजा यांचे वैदीक पद्धतीने लग्न लावण्यात आले आहे. घरीच साध्या पद्धतीनं हा विवाह सोहळा पार पडलाय.

    खासदार तडस यांची सून पूजा हिचा एक व्हिडीओ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट केला होता. त्यात तडस यांच्या सुनेनं आपल्यावर कुटुंबाकडून अन्याय होत असल्याचा आरोप केला होता. तसेच मारहाण होत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. चाकणकर यांच्याकडे पुजाने मदतीची मागणी केली होती. दरम्यान, तडस यांनी या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर अखेर संध्याकाळच्या सुमारास पंकज तडस आणि पूजा यांचा विवाह पार पडला आहे.

    हा विवाह सोहळा पार पडल्यानंतर पूजाने आपली तक्रारही मागे घेतली आहे. सकाळी मी खूप पॅनिक झाले होते. सकाळी माझ्या गाडीसमोरुन कुणीतरी गेलं त्यावेळी मला खूप भीती वाटली होती आणि त्यामुळे आपण ती तक्रार केली होती. आता पंकज यांच्याबद्दल आपली कुठलीही तक्रार नाही असं पूजाने सांगितलं.