प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

महा. स्पिन कॉटन जिनिंग कंपनीमध्ये कामाला का गेला? या कारणावरुन झालेल्या वादात आरोपींनी युवकास मारहाण केली. अमर गणेश तळवेकर (27) रा. सेलडोह असे मारहाणीत जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी तक्रारीवरुन सिंदी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर घटना गुरूवार 31 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजताचे दरम्यान घडली.

सेलू (Selu).  महा. स्पिन कॉटन जिनिंग कंपनीमध्ये कामाला का गेला? या कारणावरुन झालेल्या वादात आरोपींनी युवकास मारहाण केली. अमर गणेश तळवेकर (27) रा. सेलडोह असे मारहाणीत जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी तक्रारीवरुन सिंदी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर घटना गुरूवार 31 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजताचे दरम्यान घडली.

सेलडोह येथील महा. स्पिन कॉटन जिनिंग कंपनीमधे कामाला कां गेला यावरुन अमर तळवेकर याला सेलडोह येथीलच शरद यादव सोनटक्के व राजू मेव्हुणे यांनी जिनिंगचे बाहेर पकडून लोखंडी सळाखीने मारले. यात अमर जखमी झाला. यांसह त्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. अमरने याबाबत सिंदी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपीवर आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणेदार प्रशांत काळे यांचे मार्गदर्शनात शामराव इवनाथे पुढील तपास करीत आहे.