सरकारी तसेच खासगी कार्यालयातील बीएसएनएलची सेवा ठप्प; नागरिक आणि प्रशासन त्रस्त

आंजी येथे मागील अनेक वर्षापासून संपूर्ण ग्रामीण भागात बीएसएनएलची इंटरनेट प्रणालीचा उपयोग करण्यात येत होता. येथील सरकारी तसेच खासगी कार्यालयात मागील काही दिवसांपासून बीएसएनएलची सेवा ठप्प झाली आहे.

    आंजी( Anji).  मागील अनेक वर्षापासून संपूर्ण ग्रामीण भागात बीएसएनएलची इंटरनेट प्रणालीचा उपयोग करण्यात येत होता. येथील सरकारी तसेच खासगी कार्यालयात मागील काही दिवसांपासून बीएसएनएलची सेवा ठप्प झाली आहे. परिणामी खासगी तसेच शासकीय कार्यालयातील टेलिफोन बंद असल्याने नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष देत टेलिफोनची सेवा सुरू करावी अशी मागणी नागरिक करीत आहे.

    आंजी येथे बीएसएनएलचे उपक्रेंद्र आहे. पूर्वी प्रत्येक घरी तसेच शासकीय तसेच खासगी कार्यालयात बीएसएनएलचे लॅंडलाइन फोन दिसून येत होते. परंतु सध्या परिस्थितीत बीएसएनएलची सेवा ठप्प झाल्याचे दिसुन येते. बीएसएनएलची लिंकच रहात नसल्याने ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

    येथील उपकेंद्रात एकच कर्मचारी कार्यरत होता. मात्र आता उपकेंद्रात कर्मचारी नसल्याने नागरिकांना तक्रार करणे कठीण झाले आहे. यामुळे नागरिकांनी घरी असलेले टेलिफोन बंद केले आहे. करिता याठिकाणची बीएसएनएलची सेवा तत्काळ सुरू करावी अशी मागणी नागरिक करीत आहे.