वातावरणातील बदलाने आंब्यांची गोडी महागणार; निसर्गाच्या लहरीपणाचा फटका

मात्र, वातावरणात अचानक बदल झाला. ढगाळ वातावरण निर्माण झाले. गारासंह पाऊस पडू लागला. वादळवा-यानेसुद्धा कहर केला. झाडांवरील बहरलेली मोहोर व लागलेले आंबे गळून जमिनीवर पडू लागली.

    वर्धा. मोहोरलेल्या आंब्यावर वातावरणातील आकस्मिक झालेल्या पदलाने विपरीत परिणाम पडला आहे. झा़डावरील आंबे व मोहोर गळून पडत असल्याने सुमारे 25 टक्क्यांवर उत्पादन घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, आंब्यांची गोडी महागणार असल्याचा अंदाज बाजारत वर्तविल्या जात आहे.

    तालुक्यात एकेकाळी मोठमोठ्या गावरान आमराई होत्या. मात्र, काळाच्या ओघात त्या हळूहळू नष्ट होऊ लागल्या. आता क्वचित आंब्यांची मोठी झाडे दिमाखात उभी दिसतात. तर, दुसरीकडे मोठी झाडे तोडून अनेकांनी कमी उंचीचे व भरघोस पीक देणारे संशोधित झाडाची लागवड करून आंब्यांची बागा तयार केल्या आहे.

    यावर्षी सुरुवातीला पोषक वातावरण असल्याने आंब्याची झाडे चांगलीच मोहरली होती. त्यामुळे आंबा उत्पादन शेतक-यांच्या आशा पल्लवीत झाल्या. तर माफक दरात भरपूर आंबा खायला मिळणार, रसाची गोडी चालता येणार या अपेक्षेने नागरिकांच्या तोंडालापाणी सुटू लागले होते.

    मात्र, वातावरणात अचानक बदल झाला. ढगाळ वातावरण निर्माण झाले. गारासंह पाऊस पडू लागला. वादळवा-यानेसुद्धा कहर केला. झाडांवरील बहरलेली मोहोर व लागलेले आंबे गळून जमिनीवर पडू लागली. पाहता पाहता अर्ध्यापेक्षा जास्त झाडे खाली झाली. तर अशा अवस्थेतसुद्धा झाडांवर टिकून असलेल्या मोहोरवर हवामानाच्या सततच्या बदलाचा दुष्परिणाम दिसू लागला. झाडांवरील मोहोरसुद्धा काळपटली. परिणामी, आंब्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वातावरणाच्या या बदलाने शेतक-यांच्या अपेक्षेवर विरजण पडले आहे.

    त्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसणार आहे. पर्यावरणाने आंब्याच्या दरातसुद्धा वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. माफक दरात आंब्याच्या रसाची गोडी चाखता येईल, या अपेक्षेत असणा-या ग्राहकांसुद्धा वाढीवदरात आंबे खरेदी करुन आपली हौस भागवावी लागणारे आहे. या बदलामुळे आंबा उत्पादन शेतक-यांना आर्थिक फटका बसणार असल्याने त्यांची चिंता वाढली आहे.