Court to hear Ankita's arson case in Hinganghat on February 5

हिंगणघाट येथील बहुचर्चीत असलेल्या जळीतकांडामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. त्यामुळे, या खटल्याचा निकाल जलदगतीने लावण्यासाठी  उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती.

    नागपूर : ३ फेब्रुवारी २०२० रोजी आरोपी विकेश नगराळे याने नंदोरी चौकातून कॉलेजच्या दिशेने जाताना शिक्षिकेला पेट्रोल टाकून पेटविले होते. यात गंभीररीत्या जळालेल्या अंकिताला नागपूरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल करून तिच्यावर उपचार सुरू झाले. त्यानंतर, १० फेब्रुवारीला पीडितेची मृत्यूशी झुंज संपली. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात खळबळ माजली होती. या प्रकरणी शासनाने उज्वल निकम यांची नियुक्ती केली होती. घटनेपासून आरोपी विकेश नगराळे कारागृहात आहे. (Wardha hinganghat murder case to be heard in court on February 5)

    हिंगणघाट येथील बहुचर्चीत असलेल्या जळीतकांडामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. त्यामुळे, या खटल्याचा निकाल जलदगतीने लावण्यासाठी  उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती. या प्रकरणात आतापर्यंत २९ साक्षीदार तपासण्यात आले आहेत. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे आरोपीने गुन्हा केला आहे की नाही हे आता न्यायालय ठरवणार आहे, अशी माहिती सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली. आता आरोपी विकेश नगराळेचे वकील यांनी दोन्ही पक्षाचे लेखी आणि मौखिक युक्तिवाद संपला असून न्यायालय ५ तारखेला निर्णय देणार असल्याच सांगितले.
    या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळाले. या प्रकरणात महिला तपासी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव यांनी कार्यालयीन कामकाजाच्या १९ दिवसांत दोषारोप पत्र पूर्ण केले. तसेच, शुक्रवारी २८ फेब्रुवारीला या प्रकरणातील आरोपी विकेश नगराळे याच्याविरुद्ध तब्बल ४२६ पानांचे दोषारोपपत्र हिंगणघाटच्या प्रथम श्रेणी न्यायालयात दाखल करण्यात आले होते. आता या प्रकरणाचा निकालाकडे सर्वांच्या नजरा  लागल्या आहे. तर, या प्रकरणानंतर राज्यात शक्ती कायदा आणण्याचे सांगण्यात आले होते. हिवाळी अधिवेशनात हा कायदा विधिमंडळात मंजूर सुद्धा करण्यात आला. (Wardha hinganghat murder case to be heard in court on February 5)