प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

किरकोळ कारणावरून झालेल्या वाद व मारहाणीत इसमाचा मृत्यू झाला. रामभाऊ सुरकार रा. घोराड असे मृतकाचे नाव आहे. ही घटना 30 डिसेंबरला घडली. याप्रकरणी पोलिसात तक्रार झाल्यानंतर महादेव माहूरे यांचे विरूद्ध 302 चा गुन्हा दाखल करण्यात आला.

सेलू (Selu).  किरकोळ कारणावरून झालेल्या वाद व मारहाणीत इसमाचा मृत्यू झाला. रामभाऊ सुरकार रा. घोराड असे मृतकाचे नाव आहे. ही घटना 30 डिसेंबरला घडली. याप्रकरणी पोलिसात तक्रार झाल्यानंतर महादेव माहूरे यांचे विरूद्ध 302 चा गुन्हा दाखल करण्यात आला.

मृतक रामभाऊ सुरकार यांची बैलजोडी तीन दिवस पुष्पा राजू वरटकर यांचे शेतात कामाला होती. त्याचे पैसे मागण्यासाठी रामभाऊ सूरकार हे पुष्पा वरटकर यांचे घरी गेले होते. तेव्हा महादेव माहूरे हे सुरकार यांचे जोडीवर कामाला असल्याने तीन दिवसाची मजुरी कापून भाड्याचे पैसे दिले. तेव्हा सुरकार व माहूरे यांच्यात बाचाबाची व धक्काबुक्की झाली. त्यात रामभाऊ खाली पडले. त्या नंतर त्यांच्या पुतण्याने त्यांना घरी आणले असता काही वेळाने त्यांचा मृत्यू झाला. याची तक्रार मृतकाचे पत्नी चंद्रकला सुरकार यांनी पोलिसात दिली.

त्यानुसार पोलिस ताफा गावात दाखल झाला होता. सेलू ग्रामीण रुग्णालयात मृतकाचे शव विच्छेदन करण्यात आले. गुरवारला त्यांचे पार्थिवावर अंत्य संस्कार करण्यात आले. मृतकाचे पत्नीच्या तक्रारीवरून महादेव माहूरे यांचे विरोधात भादवीचे कलम 302 नुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास पीएसआय कोहळे, पोलिस कर्मचारी ढोणे करीत आहे.