In the case of Kadam Hospital in Wardha, Dr. Neeraj Kadam arrested

कदम रुग्णालयतील आवारात डॉ. नीरज कदम यांच्या सोबत आर्वी पोलिस तसेच आरोग्य विभागाच्या पथकाने तपासणी केली. तपासणी दरम्यान कदम यांच्या घरात कळविटीची कातडी सापडली आहे. तर, पथकला काही औषधी आणि इंजेक्शन सुद्धा मिळाले आहे.

    वर्धा : आर्वीतील बहुचर्चित कदम रुग्नालयातील गर्भपात प्रकरणात  डॉ. नीरज कदम यांना अटक झाली आहे. आज पहाटेच्या सुमारास ही अटक करण्यात आली. ही अटक बाल लैंगिक अत्याचार, पॉस्को अतंर्गत केली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांनी दिली. या प्रकरणातील एक मुख्य आरोपी असलेल्या डॉ. रेखा कदम या आधीपासूनच पोलिसांच्या ताब्यात आहेत. तर, आता दुसरे मुख्य आरोपी आणि डॉ. रेखा कदम यांचे पती डॉ. नीरज कदम यांच्यावर सुद्धा पोलिसांनी पंजा कसला आहे. 

    रुग्णालय आवारात बायोगॅस चेंबरमध्ये १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचे गर्भपाताचे भ्रुण शोधण्यासाठी पोलिसांनी तपासणी केली. मात्र, पोलिसांना या चेंबरमध्ये १२ कवट्या अन् ५५ हाडांचे अवशेष त्यावेळी सापडले आहे. त्या प्रकरणी पोलिसांनी डॉ. रेखा कदम आणि त्यांची परिचारिका यांना अटक केली होती. आर्वी येथील कदम रुग्णालयात गर्भपात केंद्र आणि सोनोग्राफी सेंटर आहे. येथील गर्भपात केंद्र हे डॉ. नीरज कदमांच्या आई डॉ. शैलेजा कदम यांच्या नावावर आहे. तर, सोनोग्राफी सेंटर हे डॉ. रेखा कदम आणि डॉ. नीरज कदम या दोघांच्या नावाने आहे. पोलिसांनी तपासादरम्यान डॉ. रेखा कदमला अटक केली होती. 
    मात्र, या रुग्णालयाचा गर्भपात केंद्राचा परवाना हा डॉ. शैलेजा कदम यांच्या नावे आहे. तरी, त्यांना चौकशीसाठीचे पत्र पोलिसांनी बुधवारी दिले होते. या  दरम्यान शैलेजा कदम यांची प्रकृती खालावली. त्यांना शुक्रवारी नागपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. तसेच, कदम रुग्णालयतील आवारात डॉ. नीरज कदम यांच्या सोबत आर्वी पोलिस तसेच आरोग्य विभागाच्या पथकाने तपासणी केली. तपासणी दरम्यान कदम यांच्या घरात कळविटीची कातडी सापडली आहे. तर, पथकला काही औषधी आणि इंजेक्शन सुद्धा मिळाले आहे. सर्व पुरावे आरोग्य विभागाने जप्त केले आहे. दिवसभर चाललेल्या तपासणीनंतर आर्वी पोलिसांनी डॉ. नीरज कदम यांना मध्यरात्री बेड्या ठोकल्या. त्यामुळे, आता या प्रकरणात आरोपींची संख्या सहावर पोहचली आहे.

    विशेष बाब अशी, सोनोग्राफी केंद्राच्या परवान्याची मुदत १९ डिसेंबर २०२१ मध्येच संपली होती. परवाना नुतनीकरणासाठी त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे प्रस्ताव पाठविला असून परवाना नुतनीकरण अजूनही प्रक्रियेत आहे. मात्र, गर्भपाताचा कुठलाही परवाना नसताना डॉ. रेखा कदम यांनी गर्भपात कसा केला, हा प्रश्न येथे उत्पन्न होतो आहे.