वर्ध्यात कोरोनाने हिरावले ३७६ बालकांचे छत्र, बालकल्याण विभागाच्या सर्वेक्षणात तथ्य आले समोर

संपूर्ण देशात कोरोनाने (Corona) चांगलाच हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे अनेकांच्या डोक्यावरील छत्र हिरावले आहे. वर्धा जिल्ह्यात कोरोनाने तब्बल ३७६ बालकांच्या डोक्यावरील पालकांचे छत्र (Both parents) हिरावले आहे. यात ६ बालकांच्या दोन्ही पालक तर ३७० बालकांच्या एका पालकाचा मृत्यू झाला आहे.

  वर्धा (Wardha).  संपूर्ण देशात कोरोनाने (Corona) चांगलाच हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे अनेकांच्या डोक्यावरील छत्र हिरावले आहे. वर्धा जिल्ह्यात कोरोनाने तब्बल ३७६ बालकांच्या डोक्यावरील पालकांचे छत्र (Both parents) हिरावले आहे. यात ६ बालकांच्या दोन्ही पालक तर ३७० बालकांच्या एका पालकाचा मृत्यू झाला आहे. सध्या या अशा बालकांच्या बालकल्याण विभागातर्फे (the Child Welfare Department) सर्वेक्षण केले जात आहे.

  वर्ध्यात सरकारी मदतीची अद्याप प्रतीक्षा
  वर्धा तालुक्याच्या आलोडी येथील इंगोले कुटुंब राहते. या कुटुंबात आई – वडील एक मुलगा आणि एक मुलगी असाच परिवार. पण गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात वडील राजू इंगोले यांचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ ऑक्टोबर महिन्यात आई छाया इंगोले यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला. पालकांचे छत्र हरविलेल्या भावंडांनी एकमेकांना आधार देत पुढील आयुष्याचा लढा सुरु केला.

  घरखर्च कसाबसा आतापर्यंत आटोपला जातो. पण पैसे मात्र कधीतरी संपतात, त्यामुळे आता ही भावंड आपल्या वडिलांच्या पेन्शन निधीची प्रतीक्षा करीत आहेत. सरकारी मदत पोहोचेल असे त्यांच्या ध्यानीमनी देखील नाही. मदत मात्र अजून तरी मिळाली नसल्याचे ही भावंड सांगत आहेत. सध्या हे बालक आपल्या आजी सोबत राहतात. त्या आजीनेही सरकारकडून मदतीची अपेक्षा केली जात आहे. संसाराचा गाढा चालविण्यासाठी या परिवाराला मदतीची गरज आहे.

  सरकारकडून तातडीने अंमलबजावणी होणे गरजेचे
  दरम्यान सध्या कोरोनामध्ये पालक हिरावलेल्या बालकांचे महिला बालकल्याण विभागाकडून सर्वेक्षण केले जात आहे. आतापर्यंत पालक गमावलेल्या 376 लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. राज्य सरकारकडून या बालकांसाठी योजना सुरू करण्यात आली आहे. यात एक पालक आणि दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी बाल संगोपन योजनेअंतर्गत 1100 रुपये मासिक मदत दिली जाणार आहे. तर याव्यतिरिक्त दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या नावे सरकारकडून पाच लाखांची मदत केली जाणार आहे. सरकारकडून या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. मात्र त्याची अंमलबजावणी तातडीने होणे गरजेचे आहे.