Kadam hospital shocking news, remains of infant bones found in dung gas tank

कदम रुग्णालयातील आवारात चक्क  गोबर गॅसच्या टाकीत अर्भकांच्या हाडांचे अवशेष सापडले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्भकांचे अवशेष सापडल्याने या प्रकरणाला आता अधिकच गंभीर वळण प्राप्त झाले आहे.

    वर्धा : वर्धा जिल्ह्यातील आर्वीतील कदम रुग्णालयातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली. या रुग्णालयाच्या परिसरातून गर्भपात करण्यात आलेल्या अर्भकाचे अवशेष सापडले आहे. या रुग्णालयावर आधीपासूनच एका १३ वर्षीय मुलीचा अवैध गर्भपात केल्या प्रकरणी कारवाई सुरु आहे. त्यात आता अधिकच भर पडली आहे. गर्भपात प्रकरणात रुग्णालयाच्या संचालिका डॉ. रेखा कदम आणि परिचारिका संगीता काळे यांना अटक झाली आहे. तर आता कदम रुग्णालयातील आवारात चक्क  गोबर गॅसच्या टाकीत अर्भकांच्या हाडांचे अवशेष सापडले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्भकांचे अवशेष सापडल्याने या प्रकरणाला आता अधिकच गंभीर वळण प्राप्त झाले आहे.
    या रुग्णालयाच्या परिसरातील गोबर गॅसच्या टाकीत अर्भकांच्या अकरा कवट्या आणि पंचावन्न हाडे प्राप्त झाली आहे. गर्भपात प्रकरणात रुग्णालयाच्या संचालिका डॉ. रेखा कदम आणि परिचारिका संगीता काळे यांच्यावर आधीच कारवाई करण्यात आली आहे. यांच्यावर सहा जानेवारीला एका १३ वर्षीय बालिकेचा पाच महिन्याचा गर्भाचा गर्भपात केल्याचा आरोप आहे.
     
    या प्रकरणाची दखल घेत, पोलीसांनी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्सना बोलावून  ते सर्व सापडलेले अवशेष डॉक्टरांच्या ताब्यात दिले आहेत. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहे.