पुनर्वसित भादोड गावात सुविधांचा अभाव; अकाली पावसामुळे रस्ते झाले चिखलमय

आर्वी तालुक्यातील भादोड गावाचे पुनर्वसन आर्वी लगत झाले आहे. इतर पुनर्वसित गावांप्रमाणे या पुनर्वसित गावात 18 नागरी सुविधांचा अभाव दिसून येतो.  पुनर्वसित गावांचे प्रश्न महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वारंवार लक्ष वेधण्यात आले होते.

    आर्वी (Arvi).  तालुक्यातील भादोड गावाचे पुनर्वसन आर्वी लगत झाले आहे. इतर पुनर्वसित गावांप्रमाणे या पुनर्वसित गावात 18 नागरी सुविधांचा अभाव दिसून येतो.  पुनर्वसित गावांचे प्रश्न महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वारंवार लक्ष वेधण्यात आले होते. त्याचे फलित म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी 35 कोटी रुपये एवढा निधी जिल्हाधिकारी वर्धा मार्फत निम्म वर्धा प्रकल्प वर्धा यांच्याकडे सुपूर्द केला होता. परंतु निम्म वर्धा प्रकल्प वर्धा यांच्या ढिसाळ नियोजनामुळेच पुनर्वसित गावातील समस्या ऐरणीवर आहे.

    देखभाल व दुरुस्तीची कामे विविध विभागाना विभागून दिली आणि स्वतः निम्न वर्धा प्रकल्प वर्धा यांनी दिलेल्या निधीतून योग्य गुणवत्तापूर्ण कामे होत आहे की नाही याची साधी चौकशीही केली नाही. भादोड पुनर्वसित गावातील अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण प्रथम आणि पाणीपुरवठ्याची कामे नंतर करण्यात आली. त्यामुळे जेसीबीने पाईपलाईनची कामे करण्यात आली असता संपूर्ण गाव पाऊस आल्यावर चिखलमय होतो.

    त्यात भादोड गावातील मुख्य रोडचे डांबरीकरण न केल्याने सद्यस्थितीत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पाऊसाने गावातून बाहेर पडून आर्वी – देऊरवाडा राज्य महामार्गावर जाणाऱ्या रस्त्या संपूर्ण चिखलमय होत आहे. त्यामुळे दोन चाकी वाहने, चारचाकी वाहन चालकांसह पायदळ चालने देखील कठीण झाले आहे. पावसाळ्यात परीस्थिती आणखीनच बिकट होईल अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.