संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

शहरातील दळणवळण सोयीस्कर होण्याकरिता सध्या उड्डाणपूल आणि रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. निधी अभावी काम अर्धवट सोडून ठेकेदार मात्र गावाला गेला आहे. त्यामुळे नागरिकांना रहदारीला अडचण निर्माण होत आहे. केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत बजाज चौक परिसरातील बोरगाव कडे जाणारा उड्डाणपूल तसेच बजाज पुतळ्यापासून शास्त्री चौकापर्यंत सिमेंट रस्त्यांचे काम गेल्या दोन वर्षापासून प्रगतीपथावर आहे. या कामाकरिता 27 कोटी रुपयांची मंजुरी आहे. या रस्त्याचे काम कन्स्ट्रक्शन अहमदनगर यांच्याकडे आहे.

वर्धा (Wardha).  शहरातील दळणवळण सोयीस्कर होण्याकरिता सध्या उड्डाणपूल आणि रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. निधी अभावी काम अर्धवट सोडून ठेकेदार मात्र गावाला गेला आहे. त्यामुळे नागरिकांना रहदारीला अडचण निर्माण होत आहे. केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत बजाज चौक परिसरातील बोरगाव कडे जाणारा उड्डाणपूल तसेच बजाज पुतळ्यापासून शास्त्री चौकापर्यंत सिमेंट रस्त्यांचे काम गेल्या दोन वर्षापासून प्रगतीपथावर आहे. या कामाकरिता 27 कोटी रुपयांची मंजुरी आहे. या रस्त्याचे काम कन्स्ट्रक्शन अहमदनगर यांच्याकडे आहे.

बजाज पुतळ्यापासून शास्त्री चौकाकडे जाणारा रस्ता एका बाजूने पूर्ण तयार झाला आहे. परंतु, एका बाजूने रस्त्याचे अर्धवट बांधकाम करून ठेकेदाराने सोडले आहे. दिवाळीपूर्वी रस्त्याचे काम सुरू होते. परंतु] गेल्या दोन महिन्यापासून काम पूर्णतः बंद पडले असल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. ठेकेदाराला निधी न मिळाल्यामुळे काम अर्धवट सोडून गावाकडे गेला आहे.

निधीच उपलब्ध नाही
ठेकेदाराला अडीच कोटी एवढी रक्कम देणे आहे. त्यामुळे त्याने ते काम बंद केले हे सत्य आहे. शिवाय रेल्वे पुलासाठी लखनऊ येथून अद्याप बांधकामाची परवानगी यायची आहे. त्यामुळे काम थांबले आहे.
— महेश माथुरकर, उपकार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, वर्धा