वर्ध्याच्या केळझर भागात पट्टेदार वाघाचा मृत्यू, वनअधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट

वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील केळझर नजीकच्या पिर बाबा टेकरी जवळ एका चार वर्षीय वाघाचा मृतदेह पाण्यात आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळ गाठून वाघाचा मृतदेह ताब्यात घेतला.

    वर्धा (Wardha).  सेलू तालुक्यातील केळझर नजीकच्या पिर बाबा टेकरी जवळ एका चार वर्षीय वाघाचा मृतदेह पाण्यात आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळ गाठून वाघाचा मृतदेह ताब्यात घेतला. संबंधितांनी बारकाईने पाहणी केली असता ती वाघिण असल्याचे निदर्शनास आले.

    प्रवाहित विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने वाघाचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात असून या घटनेची सखोल चौकशी सध्या वनविभागाचे अधिकारी करीत आहेत.