सिंदीच्या नगराध्यक्ष अपात्र घोषित; जिल्हाधिका-यांनी काढला आदेश

वर्धा (Wardha). नगराध्यक्षपदी आरूढ झाल्यानंतर 180 दिवसांत घरी शौचालय असल्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. तसेच त्याचा वापर करीत असल्याचे प्रमाणपत्र शासनाकडे जमा करावे लागते. परंतु, सिंदी रेल्वे नगर परिषदेच्या अध्यक्षांनी कोणतेही प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे जिल्हाधिकारी वर्धा यांनी त्यांना अपात्र घोषित केले आहे. महाराष्ट्रात शौचालयाचे प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे नगराध्यक्षांना अपात्र घोषित करण्याची ही पहिलीच वेगळ आहे, हे विशेष.

भाजपच्या अंतर्गत राजकारणाच्या नगराध्यक्षा संगीता शेंडे बळी ठरल्या आहे.
सिंदी रेल्वे नगर परिषदेमध्ये जनतेमधून भाजच्या संगीता शेंडे निवडूण आल्या होत्या. चार वर्षापासून या नगर परिषदेमध्ये भाजपचे नगरसेवकांसोबत नगराध्यक्षांचे अंतर्गत वाद अनेकदा चव्हाटयावर आले होते. त्यामुळे नगराध्यक्षांनी नगरपरिषदेमध्ेध वेगळी चूल मांडली होती. 180 दिवसांमध्ये शौचालय असल्याचे प्रमाणपत्र न जोडल्याने सिंदी येथील एका सामाजिक कार्यकर्त्यांनी नगरपालिका अधिनियम कलक 16(एम) नुसार जिल्हाधिकारी यांचेकडे रितसर तक्रार केली होती. याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी झाली.

जिल्हाधिका-यांनी नगराध्यक्ष संगीता शेंडे यांनी नियमांचे उल्लंघन केल्यामुळे कलम 44(3) प्रमाणे त्यांना अपात्र घोषित केले. नगराध्यक्षांची निवड ही जनतेतून झाल्यानंतर महाराष्टात16(एम) शौचालय कायदया अंतर्गत नगराध्यक्षाला बदतर्फ करण्याचा पहिलाच निकाल आहे. सिंदी नगर परिषदेमध्ये भाजपची सत्ता आहे. परंतु, गेल्या चार वर्षात नगराध्यक्ष व भाजपच्याच नगरसेवकांमध्ये तू तू- मै मै सुरू आहे. त्यामुळे नगराध्यक्षांनी विरोधी पक्षातील सदस्यांना सोबत घेऊन वेगळी चूल मांडली. याच कारणाने भाजप आणि नगराध्यक्ष हे दोन वेगळे गट पडले. काही महिन्यांपूर्वी नगराध्यक्षांच्या वागणुकीमुळे काही सदस्यांनी जिल्हाधिका-यांकडे तक्रार सुध्दा केली होती.