मुथूट फिनकार्न फायनान्स कंपनी दरोडा प्रकरण; आरोपींच्या पोलिस कोठडीत २८ डिसेंबर पर्यंत वाढ

शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या मुथूट फिनकार्न कंपनीत घातलेल्या दरोड्या मध्ये सहभागी असणा-या पाच आरोपींच्या पोलिस कोठडीत 28 डिसेंबर पर्यंत न्यायालयाने वाढ केली आहे. मागील चार दिवसात पोलिसांनी दरोड्यातील सर्व ऐवज जप्त केला आहे. जप्त केलेल्या सोन्याच्या पाकिटांची मागणी मुथूट कंपनीने ग्राहकांना परत करण्याकरिता न्यायालयालाकडे केली असून काही दिवसात परत केल्या जाणार आहे.

 (Wardha).  शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या मुथूट फिनकार्न कंपनीत घातलेल्या दरोड्या मध्ये सहभागी असणा-या पाच आरोपींच्या पोलिस कोठडीत 28 डिसेंबर पर्यंत न्यायालयाने वाढ केली आहे. मागील चार दिवसात पोलिसांनी दरोड्यातील सर्व ऐवज जप्त केला आहे. जप्त केलेल्या सोन्याच्या पाकिटांची मागणी मुथूट कंपनीने ग्राहकांना परत करण्याकरिता न्यायालयालाकडे केली असून काही दिवसात परत केल्या जाणार आहे.

वर्धा शहर पोलिसांनी आज दुपारी दोन वाजता दुसरे सह दिवाणी न्या याधीश कनिष्ठस्तर एम. वाय. नेमाडे यांच्या कोर्टात दरोड्यातील आरोपींना हजर केले होते. सरकारच्या वतीने Adv. डोरले यांनी यांनी न्यायालयात सांगितले की, आरोपीकडून या गुन्ह्यात नकली सोन्याचा वापर झाला आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेला चाकू, रोकड दोन लाख रुपये आणि हातमोजे हस्तगत करायचे असल्याने पाच दिवसांचा पोलिस रिमांड वाढवून मागितला. शिवाय दरोड्यामध्ये पाच आरोपींचा समावेश असल्याने या गुन्ह्यात कलम 395 ची वाढ करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली.

मुख्य आरोपी शाखा व्यवस्थापक महेश श्रीरंगे यांच्याकडून Adv. यास्मिन शेख यांनी युक्तिवाद करताना कोर्टाला सांगितले की, पोलिसांनी सर्व ऐवज प्राप्त केलेला आहे. आरोपीं मनीष घोळवे, कुणाल शेंद्रे, आणि जीवन गिरडकर यांचे वतीने Adv. अजय चमेडीया, या गुन्ह्यात दरोडा टाकणारा आरोपी कुशल आगाशे कडून अँड. जाहिद अली यांनी बाजू मांडली. कोर्टाने सरकारी व आरोपींच्या वकिलांची बाजू ऐकल्यानंतर 28 डिसेंबर पर्यंत पाच आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ केली.

17 डिसेंबरला दिवसाढवळ्या या कंपनीमध्ये व्यवस्थापकानेच मित्रांच्या सहकार्याने दरोडा टाकला होता. पोलिसांनी बारा तासात दरोड्यातील गुन्हा उघडकीस आणला होता. कंपनीमध्ये ग्राहकांनी गहाण केलेली एकूण 1047 पाकीट होती. परंतु, यातील फक्त 579 पाकीट चोरीला गेली होती. ती सर्व पोलिसांनी हस्तगत केली आहे.

अखेर नकली सोन्याचा डाव उघडा पडला
या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार महेश श्रीरंगे याने मित्र व पत्नीच्या नावावर 1 हजार 60 ग्रॅम नकली सोने स्वतःच्याच कंपनी मध्ये ठेवले. यावर लाखो रुपयांची उचल करून स्वतःसाठी वापर केला. कंपनीकडून येत्या काही दिवसात ऑडिट होणार होते. आपले पितळ उघडे पडू नये म्हणून कर्जाचे डोंगर कसे फेडावे. याकरिताच गुन्हा घडवून आणला. शेवटी नकली सोन्याचा डाव उघडा पडला.
Vidhar
ग्राहकांचे सोने पूर्ण सुरक्षित, प्रत्येकाला परत मिळेल
फायनान्स कंपनीत नागरिकांनी ठेवलेले गहान सोने आरोपीकडून हस्तगत झालेलं आहे. त्यामुळे कोणीही काळजी करू नये. न्यायालयीन कारवाई पूर्ण झाल्यानंतर ते सर्वांना परत मिळेल. — सत्यवीर बंडीवार, पोलिस निरीक्षक, पोलिस स्टेशन वर्धा.

न्यायालयाकडे केली जप्त सोन्याची मागणी
मुथुट फिनकॉर्न कंपनीत नागरिकांनी ठेवलेले गहान सोने पोलिसांकडे जमा आहे. ते ग्राहकांना परत द्यायचे असल्याने न्यायालयाकडे आम्ही ग्राहकांच्या नावाची यादी देऊन जप्त सोन्याची मागणी केली. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ते ग्राहकांना लवकरच देऊ.
— रितेश बढे, अधिवक्ता, मुथूट फिनकॉर्न