
वर्धा जिल्ह्यातील जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या खासगी व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या व उच्च प्राथमिक शाळा सोमवार ते शनिवारपर्यंत सकाळच्या सत्रात सकाळी ७ ते १२.३० वाजेपर्यंत घेण्यात याव्यात, असा सुधारित बदल करण्यात आला आहे.
वर्धा : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत असून, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरुन काढण्यासाठी राज्यासह वर्धा जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते इयत्ता नववीच्या सर्व माध्यमांच्या शाळा पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात आल्या आहेत. सदर शाळा सकाळी ७ ते दुपारी १२.३० या वेळेत भरविण्यात याव्यात, असे सुधारित आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाँ. सचिन ओम्बासे यांनी निर्गमित केले आहेत.
शालेय कामकाजातील विश्रांती अवकाश कमी करून सुधारित परिपत्रक निर्गमित केले आहे. त्यानुसार २९ मार्च ते ३० एप्रिल २०२२ या कालावधीत पूर्णवेळ शालेय कामकाज होण्याच्या द्रुष्टीने विश्रांती अवकाश कमी करून वर्धा जिल्ह्यातील जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या खासगी व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या व उच्च प्राथमिक शाळा सोमवार ते शनिवारपर्यंत सकाळच्या सत्रात सकाळी ७ ते १२.३० वाजेपर्यंत घेण्यात याव्यात, असा सुधारित बदल करण्यात आला आहे. शाळेत नियमित शंभर टक्के विद्यार्थी उपस्थिती राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. सुधारित परिपत्रक निर्गमित करण्यात आले असून, त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना जि.प.चे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिल्या आहेत.