उन्नती आणि सम्यक
उन्नती आणि सम्यक

वर्धा तालुक्यातील बोदळ (मलकापूर) येथील एकाच कुटुंबातील सख्ख्या दोन बहिण- भावांचा (Two brothers and sisters) अन्नातून विषबाधा (food poisoning) होऊन मृत्यू झाला. तर त्यांच्या आईलाही विषबाधा झाल्याची घटना रविवार 20 जून रोजी घडली.

    वर्धा / पुलगाव (Wardha / Pulgaon).  वर्धा तालुक्यातील बोदळ (मलकापूर) येथील एकाच कुटुंबातील सख्ख्या दोन बहिण-भावांचा (Two brothers and sisters) अन्नातून विषबाधा (food poisoning) होऊन मृत्यू झाला. तर त्यांच्या आईलाही विषबाधा झाल्याची घटना रविवार 20 जून रोजी घडली. या घटनेने कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावावर शोककळा पसरली आहे.

    वर्धा तालुक्यातील बोदळ मलकापूर येथील कांबळे कुटुंबियांनी एकत्रित जेवण केल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास उन्नती सिद्धार्थ कांबळे (वय 10), सम्यक सिद्धार्थ कांबळे (वय 2) व आरती सिद्धार्थ कांबळे उलट्या, जुलाबाचा त्रास होऊ लागल्याने या तिघांना उपचारासाठी पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान, मुलाला व आईला सेवाग्राम येथे रेफर करण्यात आले. मुलीची प्रकृती ठीक असल्याने तिला सुट्टी देण्यात आली होती. उन्नती सिद्धार्थ कांबळे (वय 10), सम्यक सिद्धार्थ कांबळे (वय 2) अशी मृत्यू झालेल्या बहिण-भावंडाची नावे आहेत.

    बोदळ मलकापूर येथे कांबळे कुटुंबीय वास्तव्यास आहे. शुक्रवार 18 जून 2021 रोजी सायंकाळी आठ वाजता कांबळे कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्रितपणे जेवण केले. मात्र, मध्यरात्री एकच्या सुमारास आई व उन्नती, सम्यक या तिघांना उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यामुळे तिघांनाही उपचारासाठी पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर सम्यक याला पुलगाव येथून उपचाराकरिता सेवाग्राम येथे दाखल करण्यात आले. सेवाग्राम येथे उपचारादरम्यान, सम्यक याचा 19 जून रोजी मृत्यू झाला.

    तर उन्नतीची प्रकृती ठिक असल्याने तिला ग्रामीण रुग्णालय पुलगाव येथून सुट्टी देण्यात आली. दुसऱ्या दिवशी 20 जून रोजी अचानक उन्नतीची प्रकृती बिघडल्यामुळे तिला सेवाग्राम येथे भरती करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान उन्नतीचा मृत्यू झाला. या सगळ्यांनी शुक्रवारी जेवताना बाहेरून आणलेली जामून खाल्ली होती. तसेच मटन खाऊन दूध पिल्याची माहिती पुढे येत आहे. मात्र, या बहिण- भावाचा मृत्यू नेमका कसा झाला, यासाठी त्याची उत्तरिय तपासणी करून व्हिसेरा पुणे प्रयोगशाळेला पाठवण्यात आले आहेत.

    आरती सिद्धार्थ कांबळे (वय 32) यांच्यावर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. दोन्ही भावंडासह त्यांची आई व वडील सिद्धार्थ कांबळे यांनीही परिवारासह जेवण केले होते. मात्र, त्यांना कोणतीही विषबाध झाली नसल्याचे म्हटले आहे. नेमकी विषबाधा झाली कशी, याचा शोध पोलिस घेत आहेत.