
ईडीकडून मंत्री अनिल परब यांना ३१ ऑगस्ट रोजी कार्यलयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. तर, ही नोटीस म्हणजे राणे विरुध्द शिवसेना या संघर्ष नाट्याचा पुढचा अंक असल्याचं बोललं जात आहे. राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेची सांगता होताच ईडीने पाठवलेल्या नोटिसीमुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश देणारी परिवनहमंत्री अनिल परब यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ‘बघून घेऊ’ ‘करारा जवाब मिलेगा’ असा इशारा देण्यात आला. त्यानंतर आता अनिल परब यांना ED कडून चौकशीसाठी हजर रहाण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.
ही नोटीस आकसातून पाठवलेली असल्याची टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. याच संदर्भात प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी आमच्या पक्षाला आणि नेत्यांना टार्गेट केलं जात असल्याचं म्हटलं आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे
वर्धा येथे माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “आमच्या सरकाच्या जेष्ठ नेत्यांना, सगळ्या मंत्र्यांना टार्गेट केले जातंय, असं मी कधीच पाहिलं नव्हतं. कधी कुणाच्या आईला तर कधी कुणाच्या बायकोला चौकशीसाठी बोलवलं जातंय. ही कुठली संस्कृती आहे? ते काय विचार करतात हे मी नाही सांगू शकत, पण हे सुसंस्कृत महाराष्ट्रात किंवा भारतीय संस्कृतीत कधी असं पाहिलं नाही, हे दुर्दैवी आहे.”
दरम्यान, ईडीकडून मंत्री अनिल परब यांना ३१ ऑगस्ट रोजी कार्यलयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. तर ही नोटीस म्हणजे राणे विरुध्द शिवसेना या संघर्ष नाट्याचा पुढचा अंक असल्याचं बोललं जात आहे. राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेची सांगता होताच ईडीने पाठवलेल्या नोटिसीमुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.