School closed due to corona; Financial crisis on school bag sellers

कोरोना या महामारीमूळे शाळा अद्याप सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक साहित्य खरेदी मंदावली आहे. त्‍याचा फटका स्कूल बॅग विक्रेत्यांना बसला आहे. शाळा कधी सुरू होणार याकडे स्कूल बॅग विक्रेत्यांचे लक्ष लागले आहे.

    वर्धा : कोरोना या महामारीमूळे शाळा अद्याप सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक साहित्य खरेदी मंदावली आहे. त्‍याचा फटका स्कूल बॅग विक्रेत्यांना बसला आहे. शाळा कधी सुरू होणार याकडे स्कूल बॅग विक्रेत्यांचे लक्ष लागले आहे.

    दरवर्षी 15 जूनपासून शाळा सुरू होतात. त्‍यापूर्वी आठ दिवसांपासून बाजारात शैक्षणिक साहित्य खरेदीची लगबग सुरू असते. यामुळे विद्यार्थ्यांना लागणाऱ्या स्‍कूलबॅग, वाटरबॅग, टिफीन, कंपास बॉक्‍स, वह्या, पेन, पेन्सिल आदी वस्‍तू खरेदी केल्या जातात.

    स्‍कूलबॅग तयार करून त्‍याची विक्री शाळा सुरू झाल्यावर प्रत्येक विद्यार्थ्याची स्‍कूलबॅगला मागणी असते. यामुळे विद्यार्थ्यांची गरज पाहून विक्रेतेदेखील त्‍याप्रमाणे स्‍कूलबॅग तयार करून त्‍याची विक्री करतात. परंतु यावर्षी मात्र स्‍कूलबॅगला मागणी नसल्याने स्‍कूलबॅग विक्रेत्यांवर आर्थिक संकट आले आहे.