वर्धा नगरपरिषदेचा अजब कारभार; आधी रचिला कळस मग बांधिला पाया

मलनिस्सारणाच्या कामाने त्रस्त असलेल्या वर्धेकराना आता नव्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. नागरिकांच्या घरातील सांडपाणी रस्त्यावरील पाईप लाईनला जोडण्याकरिता नगरपालिका सर्वे करणार आहे. या कामाकरिता वीस लाख खर्च अंदाजीत आहे. नगरपरिषदेचा अजब कारभार म्हणजेच आधी रचिला कळस मग बांधिला पाया अशी काहीशी अवस्था नगरपालिकेची झाली आहे. चिंचेच्या पानावर देऊळ रचिले, आधी कळस मग पाया रे’ असा एकनाथ महाराजांचा कूट अभंग आहे. वर्धा नगरपरिषदेची सुद्धा अशीच अवस्था झाली. मलनिस्सारणाच्या कामामुळे वर्धा शहरातील सध्या रस्ते बकाल झालेले सर्वांना माहित आहे.

  • मलनिस्सारण सांडपाणी जोडणीकरिता शहरात होणार सर्वे

संजय तिगावकर
वर्धा (Wardha).  मलनिस्सारणाच्या कामाने त्रस्त असलेल्या वर्धेकराना आता नव्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. नागरिकांच्या घरातील सांडपाणी रस्त्यावरील पाईप लाईनला जोडण्याकरिता नगरपालिका सर्वे करणार आहे. या कामाकरिता वीस लाख खर्च अंदाजीत आहे. नगरपरिषदेचा अजब कारभार म्हणजेच आधी रचिला कळस मग बांधिला पाया अशी काहीशी अवस्था नगरपालिकेची झाली आहे.
चिंचेच्या पानावर देऊळ रचिले, आधी कळस मग पाया रे’ असा एकनाथ महाराजांचा कूट अभंग आहे. वर्धा नगरपरिषदेची सुद्धा अशीच अवस्था झाली. मलनिस्सारणाच्या कामामुळे वर्धा शहरातील सध्या रस्ते बकाल झालेले सर्वांना माहित आहे.

शहरातील कोटी रुपयांचे चांगले रस्ते खोदून काढलेले आहे. त्यामुळे वर्धेकरांची नगर परिषदेविषयी प्रचंड नाराजी आहे. आता पुन्हा वर्धेकरांच्या संकटात एक नवीन भर पडणार आहे. मलनिस्सारणासाठी मुख्य रस्त्याच्या मधोमध टाकलेल्या पाइपमध्ये प्रत्येक नागरिकांच्या घरातून सांडपाण्याच्या पाइपची जोडणी करण्यात येणार आहे. नागरिकांच्या घरासमोर असलेले गुळगुळीत रस्ते फोडून काढले. आता नागरिकांचे स्वकष्टाने निर्मित सुंदर घर या उरफाट्या योजनेमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यासाठी उद्या 23 डिसेंबरला होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये विषय ठेवला आहे. मलनिस्सारण जोडणीकरीता नगरपालिका एक सर्वे करणार असून याकरिता 20 लाख रुपयांचा खर्च अंदाजीत आहे. वर्धा शहराची मालमत्ता 26000 आहे. या प्रकल्पाचा अहवाल तयार झाल्यावर नगर विकास खात्याकडे पाठवायचा आहे. नगरविकास खात्याची मंजुरी आल्यावरच पुढील कामाला सुरुवात होणार आहे.

सांडपाण्यासाठी घरातील काही भाग तोडला जाणार का?
वर्धा शहरातील प्रत्येक नागरिकांच्या घरातील सांडपाणी हे घराच्या मागच्या बाजूला आहे. मलनिस्तारण पाईप रस्त्याच्या मधोमध प्रत्येक नागरिकांच्या घरासमोर आहे. घरातील सांडपाणी काढायचे असेल तर घरातील काही भाग फोडुन काढावी लागणार आहे. यासाठी नागरिक तयार होतील काय? यासाठी कोण खर्च करणार? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.

नगरसेवकांना पुढील निवडणूक अडचणीची
गेल्या चार वर्षापासून नगरपरिषदेच्या भोंगळ कारभारामुळे जनतेमध्ये असलेल्या नाराजीचा फटका पुढील निवडणुकीत बसू शकतो. अशी धास्ती नगरसेवकांमध्ये निर्माण झाली आहे. नगरपरिषदेला ही योजना जर योग्य वाटत असेल तर सर्वसामान्य नागरिकांना याचा आर्थिक भुर्दंड पडू नये. स्वखर्चाने नगर परिषदेने ही योजना पुढे न्यावी. नागरिकांच्या हक्काचे रक्षण करण्याची नगर परिषदेचीच जबाबदारी आहे.
— प्रवीण हिवरे, सामाजिक कार्यकर्ता, वर्धा.