वैदर्भीय मंत्र्यांच्या मैत्रीचा असाही किस्सा! दत्ता मेघेंच्या मृत्यूपत्रात गडकरींचे नाव!

याराना यार का ना कभी तुटेगा! तेरा नाम ले ले कर मेरा दम छुटेंगा! पक्षीय मतभेद असेल पण मैत्रीत मनभेद नको! खासदार दत्ता मेघे आणि केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या मैत्रीचा अजरामर किस्सा

    वर्धा (Wardha) : महाराष्ट्रात राजकारणविरहित मैत्रीची (non-political friendship in Maharashtra) बरीच उदाहरणे आहेत. अशीच मैत्री आहे काँग्रेस नेते (leader Datta Meghe) माजी खासदार पण सध्या भाजपत असलेले दत्ता मेघे (Datta Meghe) आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची. मेघे यांनी मृत्यूपत्रात चक्क गडकरी यांचे नाव लिहून ठेवले आहे. या बद्दल खुद्द मेघे यांनीच माहिती दिली.

    दत्ता मेघे यांनी त्यांच्या मृत्यूपत्राबद्दल एका जाहीर कार्यक्रमामध्ये खुलासा केला. गडकरी यांचे नाव आपण मृत्यूपत्रामध्ये लिहिले असल्याचे त्यांनी सांगितले. नितीन गडकरी यांच्या हस्ते वर्धा नगरपालिकेच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. त्या कार्याक्रमाला दत्ता मेघे उपस्थित होते. त्या वेळी मेघे बोलत होते. दत्ता मेघे आणि नितीन गडकरी हे चांगले मित्र आहेत. वेगवेगळ्या पक्षात असूनही या दोघांच्या मैत्रीची नेहमीच चर्चा असते. गडकरी हे अडचणीत असताना मेघेंनी त्यांना मदत केली होती. या मदतीबद्दल गडकरी अनेक कार्यक्रमांत जाहीरपणे बोलतात. एवढेच नाही तर मेघेंचा हात कधी सोडणार नाही, असेही त्यांनी अनेकदा जाहीरपणे सांगितले आहे. मेघेंनेही त्यांच्यावर तसाच विश्वास टाकला आहे.

    मेघे म्हणाले, गडकरी हे आमच्या कुटुंबाचे महत्वाचे सदस्य आहेत. मृत्यूपत्रात कुठे काही घोळ होऊ नये, यासाठी मृत्यूपत्रात नितीन गडकरी यांचे नाव लिहिले आहे. देशातील नेतृत्व दिवस रात्र काम करुन देशाचा विकास झाला पाहिजे यासाठी झटत आहे. देशातील प्रत्येक राज्यामध्ये जाऊन नितीन गडकरी काम करत आहेत, असेही मोघे यांनी सांगितले. मेघे यांनी भाषणादरम्यान हे वक्तव्य केले. त्यावेळी गडकरी हे मंचावर त्यांच्या बाजूलाच बसलेले होते. मेघे यांचा विदर्भात शिक्षणसंस्थांचा मोठा पसारा आहे. विदर्भातील मातब्बर नेत्यांत त्यांचा समावेश होतो. ते चार वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. तसेच राज्यात काही काळासाठी मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यांचे पुत्र समीर हे हिंगणा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. स्वतः मेघे हे शरद पवार यांचे अतिशय जवळचे नेते म्हणून ओळखले जात होते. कालांतराने मेघे हे सक्रिय राजकारणापासून दूर झाले आणि त्यांनी मुलाला पुढे आणले.

    मेघे यांनी ही घोषणा केली त्या कार्यक्रमाला खासदार रामदास तडस, आमदार रामदास आंबटकर, आमदार पंकज भोयर, जिल्हा परिषद अध्यक्षा सरीता गाखरे, नगराध्यक्ष अतुल तराळे यांचे सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.