प्रतिकात्मक फोटो (Symbolic Photo)
प्रतिकात्मक फोटो (Symbolic Photo)

मजुरी करणारा शुभम गांजरे हा गावातील एका दारूविक्रेत्याकडे दारू पिण्यासाठी गेला. तिथे ३० रुपयांची दारू पिऊन घराबाहेर निघाला. या दारूविक्रेत्याने व तीन सहकाऱ्यांनी शुभम गांजरे याला मारहाण केली. शिवाय ठार मारण्याची धमकी .....

    वर्धा (Wardha) : जिल्ह्यात दारूबंदी असल्याची शासनदरबारी नोंद आहे. असे असताना खरांगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दारू चोरल्‍याच्या कारणाहून मारहाण केल्‍याची घटना घडली; विशेष म्हणजे, प्रकरण पोलिसात दाखल करण्यात आले आहे. या चोरीच्या कारणावरून शुभम गांजरे (वय २४) याला बेदम मारहाण केल्याची नोंद करण्यात आली आहे.

    जिल्‍ह्यात अवैध दारूची वाहतूक व विक्रीचे सत्र कायम आहे. पोलिस विभागाच्या वतीने दारूविक्रेत्‍यांवर कारवाईचा बडगा उगारला जाते. कारवाई केली जाते. तरीही दारूविक्री होतेच. याचे ताजे उदाहरण खरांगणा येथून सहा किमी अंतगरावर असलेल्‍या कासारखेडा गावात पाहायला मिळाले.

    शनिवारी (ता. दोन) मजुरी करणारा शुभम गांजरे हा गावातील एका दारूविक्रेत्याकडे दारू पिण्यासाठी गेला. तिथे ३० रुपयांची दारू पिऊन घराबाहेर निघाला. या दारूविक्रेत्याने व तीन सहकाऱ्यांनी शुभम गांजरे याला मारहाण केली. शिवाय ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी खरांगणा पोलिसात शुभम गांजरे याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    अती मद्य सेवनाने गावात मृत्यू
    खरांगणा येथे घटनेच्या दिवशीच सकाळी एका युवकाचा अतिमद्य सेवनाने मृत्यू झाला. याच गावात पुन्हा दारू चोरल्यावरून मारहाण करण्यात आली. असे असताना येथील पोलिस काय कारवाई याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.