मौलानाचा अवघ्या ६ वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक बलात्कार; वर्धेत खळबळ

पीडित मुलाच्या आईने तातडीने आर्वी नाका चौकात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना संबंध प्रकार सांगितला. त्यांनी महिलेला रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार महिला रामनगर पोलीस ठाण्यात गेली. तिथे तिने आपल्या मुलासोबत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.

  वर्धा (Wardha) : विकृतीला जात-पात, धर्म नसतो. पण विकृती कोणत्या टोकाची असू शकते याची देखील आपण कल्पना करु शकत नाही. कारण वर्ध्यात प्रचंड भयानक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे एका जबाबदार व्यक्तीकडून संबंधित कृत्य घडलं आहे. समाजातील जबाबदार व्यक्तीकडून अशाप्रकारचं कृत्य घडणं हे आपण कधीही अपेक्षित करु शकत नाही. पण वर्ध्यात तशी घटना घडली आहे. वर्ध्यात एका मौलानाने शरमेने मान खाली घालवणारं कृत्य केलं आहे. या मौलानाने अवघ्या 6 वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक बलात्कार केला आहे. त्यामुळे आता आपली वाटचाल नेमकी कोणत्या दिशेला होतेय? असा प्रश्न उपस्थित होतोय.

  संबंधित घटना ही मंगळवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली. समीउल्ला खान वल्क अब्दुल हमीद खान असं 25 वर्षीय आरोपी मौलानाचं नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी मौलाना विरोधात गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. संबंधित घटना उघड झाल्यानंतर वर्ध्यात एकच खळबळ उडाली. मौलाना एका 6 वर्षीय चिमुकल्यासोबत इतकं अनैसर्गिक आणि अमानुष कृत्य कसं करु शकतो? असा प्रश्न उपस्थित करुन नागरिकांकडून रोष व्यक्त केला जातोय. तसेच मुस्लीम समाजाकडूनही या प्रकरणावर तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात येतोय.

  नेमकं काय घडलं?
  आरोपी मौलानाने 6 वर्षीय चिमुकल्याला सकाळी दहा वाजेच्या सुमारास एकटं बघितलं. यावेळी तो पीडित मुलाला गोड बोलून एका खोलीत घेऊन गेला. त्याने आजूबाजूला कुणी नाही ना याची शहानिशा केली. त्यानंतर त्याने चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. यावेळी मुलगा सुटकेसाठी आक्रोश करत होता. पण त्याला वाचविण्यासाठी तिथे कुणीही पोहोचू शकलं नाही. अत्याचारानंतर आरोपीने चिमुकल्याला दमदाटी करुन तिथून हाकलून दिलं. पीडित चिमुकल्याने आई-वडिलांना सांगितलं

  आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार मुलाने घरी जावून आपल्या आई-वडिलांना सांगितला. आपल्या मुलासोबत झालेला हा प्रकार समजल्यानंतर पीडित मुलाच्या आई-वडिलांचा संतापाचा पारा चढला. पीडित मुलाच्या आईने तातडीने आर्वी नाका चौकात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना संबंध प्रकार सांगितला. त्यांनी महिलेला रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार महिला रामनगर पोलीस ठाण्यात गेली. तिथे तिने आपल्या मुलासोबत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. रामनगर पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने आरोपीचा शोध सुरु केला. अखेर पोलिसांनी आरोपी मौलाना समीउल्ला याला बेड्या ठोकल्या.

  आरोपी मौलाना दोन वर्षांपासून वर्ध्यात वास्तव्यात
  पोलीस आरोपीची सविस्तर माहिती गोळा करत आहेत. पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपी विरोधात महत्त्वाची माहिती मिळाली आहे. आरोपी मौलाना हा गेल्या दोन वर्षांपासून वर्ध्यात वास्तव्यास आहे. त्याचं शिक्षण सुरत येथील जामिया इस्लामिया अरबी मदरसातून पूर्ण झालं आहे, अशी माहिती समोर आली आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.