अॅपकॉन कंपनी विरोधात आंदोलन सुरूच; गुरूवारी आंदोलनाचा दुसरा दिवस

समृध्दी महामार्गाचे काम करणारी अॅपकॉन कंपनी व स्थानिक प्रशासनाचे विरोधात परिसरातील गावक-यांनी जन आंदोलन पुकारले आहे. परंतु, कोणताही तोडगा न निघाल्याने गुरूवारी दुस-या दिवशी आंदोलन सुरू होते. आंदोलनाचे पहिल्या दिवशी तहसीलदारांनी आंदोलन स्थळाला भेट दिली. परंतु, कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने आंदोलन सुरू ठेवण्यात आले आहे.

झडशी (Zadashi).  समृध्दी महामार्गाचे काम करणारी अॅपकॉन कंपनी व स्थानिक प्रशासनाचे विरोधात परिसरातील गावक-यांनी जन आंदोलन पुकारले आहे. परंतु, कोणताही तोडगा न निघाल्याने गुरूवारी दुस-या दिवशी आंदोलन सुरू होते. आंदोलनाचे पहिल्या दिवशी तहसीलदारांनी आंदोलन स्थळाला भेट दिली. परंतु, कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने आंदोलन सुरू ठेवण्यात आले आहे.

शेतकरी, शेतमजूर, महिला, लहान मुले असे सर्व जण बुधवारपासून गिरोली(ढगे) या गावाबाहेर चौररस्त्यावर बसून आहे. थंडीत आणि शेतीच्या कामाच्या दिवसात शेतकरी आंदोलन करीत आहे. याकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. झडशी-येळकेळी मार्गाची दुरुस्ती करण्यात यावी. शेतमालाच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी. अवैध उत्खननाची चौकशी करण्यात यावी, यामागणीकरिता हे आंदोलन करण्यात येत आहे. मागण्या मान्य होईपर्यत आंदोलन सुरू राहणार आहे, असे आंदोलनकर्त्यांचे म्हणने आहे.