एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी आंदोलन स्थळी भाकर बेसन खाऊन दिवाळी केली साजरी

आज दिवाळीसारखा सण असून सुद्धा एसटी कर्मचारी आणि त्याच्या परिवारांनी आंदोलनात भाकर बेसन खाऊन दिवाळी साजरी केली. गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचारी आपल्या विविध रास्त मागण्यांसाठी उपोषणावर बसून आहेत.

    वर्धा : आज दिवाळीसारखा सण असून सुद्धा एसटी कर्मचारी आणि त्याच्या परिवारांनी आंदोलनात भाकर बेसन खाऊन दिवाळी साजरी केली. गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचारी आपल्या विविध रास्त मागण्यांसाठी उपोषणावर बसून आहेत.

    दरम्यान कोरोना काळात आपल्या जीवाची परवा न करता बाहेर प्रांतातून येणाऱ्या जाणाऱ्या मजुरांना तसेच नागरिकांना आपल्या गांतव्यावर पोहचवण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी काम केले. परंतु अजूनही त्यांच्या मागण्यांना राज्य सरकारन गांभीर्याने घेत नसल्याने दिवाळी सारख्या सणाच्या दिवशी एसटी कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांनी बेसन भाकर खाऊन दिवाळी साजरी केली.