मिनी ट्रॅव्हल बस रस्ता दुभाजकावर आदळून पलटली; २५ प्रवासी गंभीर जखमी

ट्रॅवल भरधाव वेगात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले वाहन दुभाजकावर जाऊन धडकले. हा अपघात इतका भीषण होता की यात दोनजण जागीच ठार झाले तर २५ जण गंभीररित्या जखमी झाले.

    वर्धा (Wardha) : नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर (Nagpur-Hyderabad National Highway) भरधाव वेगात असलेली मिनी ट्रॅवल्स ( mini travels) दुभाजकावर आदळून २ जण जागीच ठार तर, २५ जण गंभीररित्या जखमी झाले. ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. वर्धा- नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील आजंती शिवारात पांढरकवडावरून मंगळवारी रात्रीच्या सुमारास मजुर घेऊन नागपूरकडे भरधाव वेगाने निघालेली मिनी ट्रॅव्हल्स क्रमांक (एम ए २९ एम ८४५४) दुभाजकावर धडकून पलटी झाली.

    ट्रॅवल भरधाव वेगात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले वाहन दुभाजकावर जाऊन धडकले. हा अपघात इतका भीषण होता की यात दोनजण जागीच ठार झाले तर २५ जण गंभीररित्या जखमी झाले. (Mini Travel Bus Accident Near Wardha)

    या ट्रॅव्हल्समधून २० ते २२ मजूर पांढरकवडावरून दिवाळीसाठी मध्य प्रदेश येथे आपल्या गावाकडे परत जात असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच हिंगणघाट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. अपघाताची नोंद हिंगणघाट पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. वर्धा : नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगात असलेली मिनी ट्रॅवल्स दुभाजकावर आदळून २ जण जागीच ठार तर, २५ जण गंभीररित्या जखमी झाले. ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. वर्धा- नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील आजंती शिवारात पांढरकवडावरून मंगळवारी रात्रीच्या सुमारास मजुर घेऊन नागपूरकडे धरधाव वेगाने निघालेली मिनी ट्रॅव्हल्स क्रमांक (एम ए २९ एम ८४५४) दुभाजकावर धडकून पलटी झाली.

    ट्रॅवल भरधाव वेगात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले वाहन दुभाजकावर जाऊन धडकले. हा अपघात इतका भीषण होता की यात दोनजण जागीच ठार झाले तर २५ जण गंभीररित्या जखमी झाले. या ट्रॅव्हल्समधून २० ते २२ मजूर पांढरकवडावरून दिवाळीसाठी मध्य प्रदेश येथे आपल्या गावाकडे परत जात असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच हिंगणघाट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. अपघाताची नोंद हिंगणघाट पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.