वर्धा जिल्ह्यात तीन अपघातात तीन ठार

  • चार जखमी

देवळी. तालुक्यात विविध ठिकाणी झालेल्या तीन अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. चारही अपघात २९ डिसेंबर रोजी घडले.
तालुक्यातील वाटखेडा चौफुलीवर झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अडेगावकडून देवळीकडे येणा-या एमएच ४० बी-३०१४  क्रमांकाच्या कारने राळेगाववरुन अंदोरीमार्गे देवळीकडे जाणा-या दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार अशोक विठोबा राऊत (४८)  यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. दुचाकीवर मागे बसलेला गंभीररित्या जखमी झाला. त्याचेवर सावंगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

अज्ञात वाहनाच्या धडकेत १ मृत  
दोघे गंभीर जखमी
अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण जागीच मरण पावला. दोघे गंभीररित्या जखमी झाले. हा अपघात २९ डिसेंबर रोजी एसएसएनजे महाविद्यालयाजवळ घडला. यामध्ये राजु कृष्णा सुरकार (४५) रा. देवळी हा जागीच मृत्यू झाला. राजू कृष्णा सुरकार हे नगर परिषदेमध्ये कार्यरत होते.  तर दोघे गंभीररित्या जखमी झाले. जखमींची नावे कळू शकली नाही.

एक ठार एक जखमी

कारचालकाने  मालवाहकास धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इसापूर नजीक घडला. राजू मनोहर लढी (४०) असे मृतकाचे नाव आहे. सालोड येथील राजू लढी हा एमएच ३१ डीके ८९ क्रमांकाच्या कारने जात होता. दरम्यान त्याने एमएच ३२ एके १५९ क्रमांकाच्या मालवाहक वाहनाला धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. मालवाहक  वाहनचालक सचिन परतपुरे (२५) हा जखमी झाला. याप्रकरणी देवळी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.