दोन अपघातात तिघांचा मृत्यू; हिंगणघाट व सेलू येथील घटना

हिंगणघाट (Hinganghat). हिंगणघाट व सेलू पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या परिसरात झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. हिंगणघाट येथील अपघातात दोन महिला व सेलू तालुक्यात घडलेल्या अपघातात एका पुरूषाचा मृत्यू झाला. हिंगणघाट येथील अपघतात सहा तर सेलू येथे झालेल्या अपघातात एक असे सात जण जखमी झाले आहे. ह्या दोन्ही घटना २८ डिसेंबर रोजी घडल्या.

वर्धा (Wardha). हिंगणघाट (Hinganghat). हिंगणघाट व सेलू पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या परिसरात झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. हिंगणघाट येथील अपघातात दोन महिला व सेलू तालुक्यात घडलेल्या अपघातात एका पुरूषाचा मृत्यू झाला. हिंगणघाट येथील अपघतात सहा तर सेलू येथे झालेल्या अपघातात एक असे सात जण जखमी झाले आहे. ह्या दोन्ही घटना २८ डिसेंबर रोजी घडल्या.

हिंगणघाट तालुक्याच्या सावली(वाघ) शिवारात ऑटो व टिप्परच्या धड़केत झालेल्या अपघातात एका शेतमजूरीसाठी जाणा-या महिलेचा जागीच मृत्यू झाला. दुस-या एका सहप्रवासी शेतमजूर महिलेचा सेवाग्राम रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. चिंधाबाई मारोती कातरे (50) असे घटनास्थळावर मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. तर सेवाग्राम रुग्णालयात संगीता बबन कापटे(48) असे सेवाग्राम येथील रूग्णालयात मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे. दोन्ही महिला शहरातील संत चोखोबा वार्ड येथील रहिवासी आहेत.

या अपघातात ऑटोचालक पिंटु उर्फ शेख शाहिद शेख हारून(30)याचेसह 9 प्रवासी ऑटोने हिंगणघाट येथून नंदोरी मार्गाने सेलु (मुरपाड)येथे जाण्यास निघाले. समोरून येणा-या एमएच 32-एजे- 2609 क्रमांकाच्या टिप्परने एमएच ३२- सी-9614 क्रमांकाच्या ऑटोला धडक दिली. यात ऑटोमधील शेतमजूरीसाठी निघालेल्या हिंगणघाट येथील 2महिला मृत्युमुखी पडल्या. इतर सहा महिलांचा जखमी झाल्यात. अपघात झाल्याचे कळताच रसत्याने जाणारे प्रवासी व गावकरी घटनास्थळी पोहोचले. यात टिप्परचालकाची चूक असल्याचे जमावाचे लक्षात येताच संतप्त जमावाने टिप्पर जाळण्याचा प्रयत्न केला.

ट्रकला धडक दिल्याने एकाचा मृत्यू
दुसरी घटना नागपूर-वर्धा मार्गावर असलेल्या कान्हापुर जवळील भारत पेट्रोलियम पेट्रोल पंपासमोर वर्धा येथे घडली. मैदा घेऊन जाणा-या वाहनातील ट्रक डिझल तपासणीसाठी उभ्या होता. दरम्यान ट्रकला वर्धेचे दिशेने भरधाव वेगाने जाणा-या ट्रकने जबर धडक दिली. यात धडक देणा-या ट्रकचा क्लिनर जागीच ठार झाला. तर सख्खा भाऊ असलेला वाहनचालक हा गंभीर झाला असून सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरु आहे. सदर घटना सोमवार दि.28 डिसेंबर रोजी पहाटे 4. 30 वाजताचे दरम्यान घडली.

सोमवारी पहाटेला कान्हापुर येथे एमपी 22-एच 2041 क्रमांकाच्या ट्रकचालकाने पेट्रोल पंपासमोर डिझल पाहण्यासाठी उभा केलाहोता. दरम्यानवर्धेच्या दिशेने भरधाव वेगाने जात असलेल्या एमएच 12-एन एक्स 1970 च्या चालकाचे नियंत्रण सुटले व तो सरळ उभ्या ट्रकवर जावून धडकला. यात धडक देणा-या ट्रकचा क्लिनर राजेश सखाराम घोडस्कर (30) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्याचा लहान भाऊ रामेश्वर सखाराम घोडस्कर (28) हा गंभीर जखमी झाला. या प्रकरणी फिर्यादी हरभजनसिंग रणजीतसिंह कालव रा. जरिपटका नागपुर याचे तक्रारीवरुन रामेश्वर घोडस्करवर सेलू पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गजानन कंगाले,वामन घोडे, राकेश देवगडे, मंगेश वाघाडे,राजू पाचारे करीत आहे.