मंगळवारी आढळले ५३ कोरोना बाधित

कोरोना बाधितांमध्ये वर्धा ३६, आर्वी २, देवळी २, हिंगणघाट १०, सेलू ३, आष्टी, कारंजा व समुद्रपूर तालुक्यात कोरोना आजाराचा एकही रूग्ण आढळून आला नाही. एकूण ५३ रूग्णांमध्ये पुरूष ३१ व २२ महिलांचा समावेश आहे.

वर्धा. आरोग्य विभागास प्राप्त अहवालानुसार मंगळवारी ५३ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर एका रूग्णाचा कोरोना आजाराने मृत्यू झाला. मृतकामध्ये आर्वी येथील ७२ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.

कोरोना बाधितांमध्ये वर्धा ३६, आर्वी २, देवळी २, हिंगणघाट १०, सेलू ३, आष्टी, कारंजा व समुद्रपूर तालुक्यात कोरोना आजाराचा एकही रूग्ण आढळून आला नाही. एकूण ५३ रूग्णांमध्ये पुरूष ३१ व २२ महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ८ हजार ७५० झाली आहे. आज १७ तर आतापर्यत एकूण कोरोनामुक्त रूग्णांची संख्या ८ हजार १९० झाली आहे. आज एकाचा तर आतापर्यत जिल्ह्यात एकूण २६७ रूग्णांचे मृत्यू झाले आहे. जिल्ह्यातील एकूण

ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
रूग्णांची संख्या २९३ झाली आहे.